ETV Bharat / state

जळगाव ते मुंबई रखडलेली विमानसेवा १ ऑगस्टपासून सुरू होणार - डीजीसीए

१ ऑगस्टपासून जळगाव ते मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. गेल्या महिनाभरापासून ट्रू-जेट कंपनीला नागरी उड्डान प्राधिकरणाकडून (DGCA) काही परवानग्या मिळणे बाकी होते. या सर्व परवानग्या गेल्या आठवड्यात प्राप्त झाल्या आहेत. यामुळे जळगावकरांना आता विमानसेवा अनुभवता येणार आहे.

जळगाव ते मुंबई रखडलेली विमानसेवा १ ऑगस्टपासून सुरू होणार
author img

By

Published : Jul 26, 2019, 7:37 PM IST

जळगाव - शहराची खंडित झालेली विमानसेवा ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यासाठी ट्रू-जेट कंपनीतर्फे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या महिन्यात कंपनीच्या डीजीसीएच्या परवानग्यांचा विषय प्रलंबित होता. आता या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. यामुळे जळगाव ते मुंबई विमानसेवा येत्या १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

जळगाव ते मुंबई रखडलेली विमानसेवा १ ऑगस्टपासून सुरू होणार

ट्रू-जेट कंपनीला विमानसेवेसाठी डीजीसीएकडून परवानगी

हैद्राबादच्या ट्रू-जेट कंपनीला जळगावातून विमानसेवा देण्याची परवानगी देण्यात आली होती. ट्रू-जेट कंपनीकडून 'अहमदाबाद ते जळगाव' व 'जळगाव ते मुंबई' या दोन ठिकाणी विमानसेवा देणार आहे, परंतु ट्रू-जेटला नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) काही परवानग्या न मिळाल्याने विमानसेवा सुरू करता येत नव्हती. अखेर ऑगस्ट महिन्यातच विमानसेवा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. डीजीसीएच्या मुंबईतील बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी जळगावच्या विमान फेऱ्यांबाबतही चर्चा केली होती.

कंपनीतर्फे विमानतळावर आवश्यक संगणकीय यंत्रणेचे काम पूर्ण

ट्रू-जेटने विमानतळावर संगणक कक्ष तयार केला असून, प्रशिक्षण घेतलेले विमानतळ व्यवस्थापक लवकरच जळगावात दाखल होणार आहेत. विमानात सामानाची चढ-उतार करणारा लोडर-अनलोडर स्टाफ या आधीच दाखल झाला आहे. विमानतळावर आवश्यक त्या सुविधादेखील करण्यात येत आहे. त्यामुळे विमानसेवा १ ऑगस्टपासूनच सुरू करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

खासदार उन्मेष पाटील यांचा विमानसेवेबद्दल संसदेत तारांकित

जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी विमानसेवेबद्दल संसदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. नागरी उड्डान मंत्री आर.के. पुरी यांनी जळगावच्या विमानसेवेसाठी ट्रू-जेट कंपनीला अहमदाबाद व मुंबई विमानतळावर पार्किंगची सुविधा देण्याबाबत व टायमिंग स्लॉट मिळण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात येतील, असेही आश्वासन दिले होते.

जळगावहून पुण्यासाठी दररोज दोन ते अडीच हजार विद्यार्थी, उद्योजक प्रवास करतात. त्यांना विमानसेवेची गरज असल्याने लवकरच मुंबई-पुणे-जळगाव या विमानसेवेची निविदा काढण्यात येणार आहे.

Intro:जळगाव
जळगाव ते मुंबई विमानसेवा येत्या १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. गेल्या महिनाभरापासून ट्रू-जेट कंपनीला नागरी उड्डयन प्राधिकरणकडून (डीजीसीए) काही बाबींच्या परवानग्या मिळणे बाकी हाेते. मात्र, या सर्व परवानग्या गेल्या आठवड्यात प्राप्त झाल्या आहेत. शिवाय विमान कंपनीतर्फे जळगाव विमानतळावर तिकीट विक्री व अन्य कामासाठी आवश्यक असलेली संगणकीय यंत्रणा उभारण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. त्यामुळे विमानसेवा १ ऑगस्टपासूनच सुरू करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.Body:शहराची खंडित झालेली विमानसेवा ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यासाठी ट्रू-जेट कंपनीतर्फे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या महिन्यात विमान कंपनीच्या डीजीसीएच्या परवानग्यांचा विषय प्रलंबित हाेता. त्यामुळे विमानसेवा सुरू हाेण्याबाबत संभ्रम हाेता. त्यात कंपनीतर्फे २५ जुलै किंवा १ ऑगस्ट राेजी विमानसेवा सुरू करण्याच्या दाेन वेगवेगळ्या तारखांचा अंदाज वर्तविला जात हाेता. परंतु, जुलै महिना अर्धा उलटूनही परवानग्या प्राप्त न झाल्याने अखेर ऑगस्ट महिन्यातच विमानसेवा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. राज्यासह देशातील अनेक जिल्ह्यांच्या विमानसेवा नव्याने सुरू करणे व खंडित सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत डीजीसीएच्या संचालकांसाेबत अलीकडेच मुंबईत बैठक झाली. या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, जळगावचे खासदार उन्मेष पाटील, काेल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती हाेती. या बैठकीत जळगावच्या विमान फेऱ्यांबाबतही चर्चा झाली.Conclusion:अहमदाबाद, मुंबई विमानतळावर पार्किंग सुविधा

विमानसेवेबद्दल जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी संसदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यात त्यांनी मागील सेवा पुरवणारी एअर डेक्कन कंपनीने पूर्वसूचना न देता सेवा बंद केली. त्याचप्रमाणे शहरातील अनेक उद्याेजकांचा सुमारे १२ लाख रुपयांचा अॅडव्हान्स परत केला नाही, याबाबत नागरी उड्डयन मंत्र्यांना विचारणा केली होती. त्यावर नागरी उड्डयन मंत्री आर.के. पुरी यांनी नागरी उड्डयन मंत्रालयाकडे तसे धाेरण नसल्याचे स्पष्ट करून यासाठी लवकरच धोरण तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. तसेच मंत्री पुरी यांनी जळगावच्या विमानसेवेसाठी ट्रू-जेट कंपनीला अहमदाबाद व मुंबई विमानतळावर पार्किंगची सुविधा देण्याबाबत व टायमिंग स्लाॅट मिळण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात येतील, असेही आश्वासन दिले होते. जळगावहून पुण्यासाठी दरराेज दाेन ते अडीच हजार विद्यार्थी, उद्योजक प्रवास करतात. त्यांना विमानसेवेची गरज असल्याने लवकरच मुंबई-पुणे-जळगाव या विमानसेवेची निविदा काढण्यात येणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.