जळगाव - नेहमीचा ताण तणाव दूर ठेवत दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलिस स्थानकात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मंदिरासमोर सत्यनारायणाच्या पूजेचा कार्यक्रम होऊन गुरुदत्तवर आधारित भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी भजन गात दत्ताचे स्मरण केले.
पोलीस स्टेशन म्हटल की वाद-विवाद भांडण, आरोपी अशा पध्दतीने संपूर्ण दिवसभराचा कारभार असतो. मात्र याच पोलीस ठाण्यात मंदिर आणि त्यातही भजनांचा कार्यक्रम आपणास ऐकलं तर आश्चर्य वाटू नये. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दत्त जयंतीनिमित्ताने भजनांचा कार्यक्रम पार पडला. आकर्षक अशा फुलांनी विद्युत रोषणाईने मंदीर तसेच सर्व पोलीस स्टेशन सजविण्यात आले होते. आकर्षक अशा पध्दतीने रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळी सत्यनारायणाची पूजा आहे. या पोलीस ठाण्यातील दत्त मंदिरात पार पडली. त्यानंतर दिवसभरात भजनांचा कार्यक्रमही झाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषाने जिल्हापेठ परिसर दणाणून निघाला. पोलिस म्हणजे चोवीस तास ऑन ड्यूटी. त्यामुळे दिवसभर आरोपी तक्रारी वादविवाद यामुळे तो ताणतणावांचा सामना करत असतो या ताणतणावातून एक दिवस मुक्तता मिळावी, आत्मिक समाधान व देवाचे नामस्मरण व्हावे याकरिता दत्तजयंतीनिमित्त भजनांचा कार्यक्रम घेतल्याचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे सांगतात.