ETV Bharat / state

जळगावमध्ये परतीच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान

उडीद, मूग ही पिके शेतात सडल्यानंतर सोयाबीन, ज्वारी, बाजरी आणि मका ही पिके तरी आपल्याला तारतील, असे शेतकऱ्यांना वाटले होते. मात्र, पावसाने शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या आशेवरही पाणी फेरले आहे.

परतीच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान
author img

By

Published : Oct 29, 2019, 4:49 PM IST

जळगाव - जिल्ह्यात सातत्याने सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस पिकाची दयनीय अवस्था झाली आहे. पावसात भिजलेल्या कापसासह धान्याला जागेवरच कोंब फुटले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत संकट कोसळले आहे.

परतीच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून एकही नक्षत्र रिकामे गेले नसून सतत पाऊस पडत आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या सुमारे 140 टक्के पाऊस पडला आहे. सततच्या पावसामुळे आधी पूर्वहंगामी उन्हाळी कपाशीचे नुकसान झाले. दसरा झाल्यानंतर घरात कापूस आल्याने दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे यावर्षी अक्षरश: दिवाळे निघाले आहे. पावसामुळे जमिनीलगतच्या कैऱ्या तसेच बोंड कुजल्यानंतर वरचा बहार तरी आपल्या हाती येईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते. प्रत्यक्षात पाऊस थांबला नसल्याने वरील फांद्याना लागलेल्या कापसाच्या बोंडांमधील सरकीलाही आता कोंब फुटले आहेत. बियाणे, खते, फवारणी तसेच मशागतीसाठी अतोनात खर्च करून सुद्धा घरात एकही बोंड न आल्याने कापूस उत्पादकांना डोक्याला हात लावावा लागला आहे.

हेही वाचा - मी म्हातारा झालो असेल तर घरी नातू-पणतू सांभाळेन, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

अशाच प्रकारे उडीद, मूग ही पिके शेतात सडल्यानंतर सोयाबीन, ज्वारी, बाजरी आणि मका ही पिके तरी आपल्याला तारतील, असे शेतकऱ्यांना वाटले होते. मात्र, पावसाने शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या आशेवरही पाणी फेरले आहे. तसे पाहिले तर परिपक्व झालेल्या सर्व पिकांची पंधरा दिवसांपूर्वीच काढणी करायला पाहिजे होती. मात्र, पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचा नाईलाज झाला असून डोळ्यादेखत मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या हंगामाची राखरांगोळी होताना पाहण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली आहे.

हेही वाचा - बाहेरून येणाऱ्यांना न्याय मिळतो, मग मी तर रक्ताचा - एकनाथ खडसे

काही शेतकऱ्यांनी दसरा झाल्यानंतर पावसाची उघडीप मिळताच ज्वारी तसेच सोयाबीची कापणी करण्याची घाई केली होती. मात्र, त्यांना कापलेले पीक उचलण्याची सवडही पावसाने दिली नाही. जमिनीवर पडलेले धान्य जागेवरच उगवत आहे. शासनाने ओल्या दुष्काळाची स्थिती लक्षात घेता नुकसानीचे पंचनामे करण्यात वेळ घालविण्यापेक्षा नुकसानग्रस्तांना सरसकट मदत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Intro:जळगाव
जिल्ह्यात सातत्याने सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आणि कापूस पिकाची दयनीय अवस्था झाली आहे. पावसात भिजलेल्या कापसासह धान्याला जागेवरच कोंब फुटले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकऱ्यांवर ऐन दिवाळीत संकट कोसळले आहे.Body:जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून एकही नक्षत्र रिकामे गेले नसून सतत पाऊस पडत आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या सुमारे १४० टक्के पाऊस पडला आहे. सततच्या पावसामुळे आधी पूर्वहंगामी उन्हाळी कपाशीचे नुकसान झाले. दसरा झाल्यानंतर घरात कापूस आल्याने दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे यावर्षी अक्षरश: दिवाळे निघाले आहे. पावसामुळे जमिनीलगतच्या कैऱ्या तसेच बोंड कुजल्यानंतर वरचा बहार तरी आपल्या हाती येईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते. प्रत्यक्षात पाऊस थांबला नसल्याने वरील फांद्याना लागलेल्या कापसाच्या बोंडांमधील सरकीलाही आता कोंब फुटले आहेत. बियाणे, खते, फवारणी तसेच मशागतीसाठी अतोनात खर्च करून सुद्धा घरात एकही बोंड न आल्याने कापूस उत्पादकांना डोक्याला हात लावावा लागला आहे. अशाच प्रकारे उडीद, मूग ही पिके शेतात सडल्यानंतर सोयाबीन, ज्वारी, बाजरी आणि मका ही पिके तरी आपल्याला तारतील, असे शेतकऱ्यांना वाटले होते. मात्र, पावसाने शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या आशेवरही पाणी फेरले आहे. तसे पाहिले तर परिपक्व झालेल्या सर्व पिकांची पंधरा दिवसांपूर्वीच काढणी करायला पाहिजे होती. परंतु, पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांचा नाईलाज झाला असून, डोळ्यादेखत मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या हंगामाची राखरांगोळी होताना पाहण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली आहे.

काही शेतकऱ्यांनी दसरा झाल्यानंतर पावसाची उघडीप मिळताच ज्वारी तसेच सोयाबीची कापणी करण्याची घाई केली होती. मात्र, त्यांना कापलेले पीक उचलण्याची सवडही पावसाने दिली नाही. जमिनीवर पडलेले धान्य जागेवरच उगवत आहे. शासनाने ओल्या दुष्काळाची स्थिती लक्षात घेता नुकसानीचे पंचनामे करण्यात वेळ घालविण्यापेक्षा नुकसानग्रस्तांना सरसकट मदत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

रब्बी हंगामावरही परिणाम होणार-

परतीचा पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने पुढील रब्बी हंगामावर देखील त्याचा विपरित परिणाम होण्याची भीती आहे. खरीप हंगाम आटोपल्यानंतर साधारणत: दिवाळीला शेतकरी रब्बी पिकांच्या पेरणीचे नियोजन करीत असतात. मात्र, सततच्या पावसामुळे खरिपाची काढणी लांबणीवर पडल्याने रब्बीच्या पेरण्यांनाही मोठा विलंब झाला आहे. पाऊस थांबत नसल्याने पेरणीपूर्व मशागतीसह अनेक कामे रखडली आहेत. रब्बीच्या पेरण्यांना आणखी उशीर झाल्यास दादर, ज्वारीसह हरभरा पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.Conclusion:जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान-

जनावरांसाठी कोरड्या वैरणीची व्यवस्था करण्यासाठी अनेक शेतकरी खरिपात संकरीत ज्वारीची पेरणी करतात. सततच्या पावसामुळे  ज्वारीचे पीक वाया गेल्याने वैरणीसाठी उपलब्ध होणारा कडबा देखील सडला आहे. सोयाबीनच्या काढणीनंतर मिळणारे कुटार पण वाया गेले. त्यामुळे जनावरांसाठी चारा आणावा कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.