ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणूक, इच्छुकांनी साधला 'दत्तजयंती'चा मुहूर्त - Jalgaon District Latest News

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी दत्त जयंतीच्या मुहूर्तावर आपले अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी तहसील कार्यालयामध्ये एकच गर्दी केली होती. मंगळवारी दिवसभर जळगाव तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची कागदपत्रे जमवाजमव करण्याची धावपळ सुरू होती.

Gram Panchayat Election Update Jalgaon
उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी
author img

By

Published : Dec 29, 2020, 6:32 PM IST

जळगाव- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी दत्त जयंतीच्या मुहूर्तावर आपले अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी तहसील कार्यालयामध्ये एकच गर्दी केली होती. मंगळवारी दिवसभर जळगाव तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची कागदपत्रे जमवाजमव करण्याची धावपळ सुरू होती.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दाेन दिवस उरले आहेत. मंगळवारी दत्त जयंतीच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत नामनिर्देशन सादर करण्यासाठी सुरुवातीच्या तीन दिवसांत अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातून पहिल्या दोन दिवसात केवळ ७१ अर्ज दाखल झाले होते. साेमवारी ही संख्या हजाराच्या पुढे गेली. आता मंगळवार व बुधवार असे दोनच दिवस अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने मंगळवारी दत्तजयंतीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी

कागदपत्रांची जंत्री पूर्ण करताना दमछाक-

अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जंत्री पूर्ण करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. यातच अर्ज दाखल करण्यासाठी यंदा केवळ पाचच दिवसांचा अवधी मिळाला आहे. यातही दिवसातून चार तास अर्ज स्वीकृतीसाठी ठेवण्यात आले आहेत. आता तर पहिले तीन दिवस पूर्ण झाले आहेत. यामुळे उर्वरित दोन दिवसात अर्ज दाखल करण्याची कसरत उमेदवारांना करावी लागणार असल्याची स्थिती आहे. गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन, जळगाव येथील तहसील कार्यालयात ठिकठिकाणी बॅरिकेड‌्स लावण्यास आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करताना ताेंडाला मास्क लावण्याच्याही सूचना वारंवार केल्या जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.