जळगाव - नगरचना विभागात कामासाठी आलेल्या नागरिकांची फिरवा फिरव केली जाते. याठिकाणी विभागात एजंटगीरी चालली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे काम होत नाही. यामुळे या प्रशासकीय विभागात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप नगरसेवक प्रशांत नाईक ( Corporator Prashant Naik ) यांनी केला आहे. यावर महापौर जयश्री महाजन ( Mayor Jayashree Mahajan ) यांनी प्रतिक्रिया दिली असून त्या म्हणाल्या, याबाबत नगरसेवक नाईक यांनी महापौर म्हणजेच आमच्याकडे व पालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करावी.
काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांच्यात मुक्ताईनगरात अवैधधंदे तसेच बोदवड नगरपंचायतील गोंधळ यावरुन वाद पेटला होता. यानंतर रोहिणी खडसे -खेवलकर यांनी आमदारांना चोप देण्याची भाषा करत मुक्ताईनगरातील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले होते. आमदार चंद्रकांत पाटील यांनीही खडसे परिवाराकडून धोका असल्याचे सांगत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. यावरुन दोघांमधील संघर्ष शिगेला पोहोचला. यातच रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. शिवसेनेने हा हल्ला केल्याचा आरोप रोहिणी खडसेंनी केला असून त्यानुसार त्यांच्या तक्रारीवरुन शिवसेना पदाधिकार्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल आहे.
खासदार उन्मेष पाटील यांनी कुंपणच शेत खाते, अशी टीका करत गुलाबराव पाटालांवर केली होती. याप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील ( Guardian Minister Gulabrao Patil ) यांनी खासदारांच्या टीकेवर पलटवार करत नदी परिक्रमा मोहीमेवर टीका करत त्यांनी केलेली टीका म्हणजे त्यांना गुलाबराव पाटील नावाचा रोग झाला असून केवळ स्टंटबाजी म्हणून खासदार सर्व खटाटोप करत आहे, अशी टीक गुलाबराव पाटलांनी केली आहे. यामुळे घटनांमुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे.
हेही वाचा - Gulabrao Patil Criticized Narayan Rane : आम्ही नारायण राणे सारख्या माणसाला खपवतो - गुलाबराव पाटील