ETV Bharat / state

कोरोनाबाधित वृद्धेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी बळजबरीने नेले बाहेर; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल - जळगाव पोलीस

याप्रकरणी गणपती हॉस्पिटलचे रुग्णालय अधीक्षक म्हणून काम पाहणारे डॉ. वैभव दिगंबर सोनार यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डॉ. वैभव सोनार हे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

jalgaon
जळगाव पोलीस
author img

By

Published : Jun 30, 2020, 10:21 PM IST

जळगाव - कोरोनाबाधित असलेल्या वृद्धेच्या रक्ताचे नमुने बळजबरीने काढून घेत ते तपासणीसाठी बाहेरच्या खासगी रुग्णालयात नेल्याचा धक्कादायक प्रकार जळगावातील एका कोविड सेंटरमध्ये घडला. याप्रकरणी वृद्धेच्या मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिग्रहित केलेल्या गणपती हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी गणपती हॉस्पिटलचे रुग्णालय अधीक्षक म्हणून काम पाहणारे डॉ. वैभव दिगंबर सोनार यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डॉ. वैभव सोनार हे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. जळगावातील शिवकॉलनीत राहणाऱ्या एका 69 वर्षीय वृद्धेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तिच्यावर गणपती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास या वृद्धेचा मुलगा गणपती हॉस्पिटलमध्ये आला. त्याने, खासगी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला माझ्या आईची बाहेरील खासगी लॅबमध्ये रक्त तपासणी करायची आहे. त्यामुळे मला तिचे रक्ताचे नमुने घेऊ द्या, असे रुग्णालयात ड्युटीवर असलेले डॉ. स्वप्निल कळसकर यांना सांगितले. परंतु, तसे करता येत नसल्याने डॉ. कळसकर यांनी त्याला नकार दिला. म्हणून त्याने हुज्जत घातली. नंतर डॉ. कळसकर यांनी हा प्रकार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत सुपे यांना सांगितला. दोघांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण तो ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याने डॉक्टर्स तसेच नर्सिंग स्टाफचे ऐकून घेतले नाही. रुग्णालयात सुरक्षा बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी विजय जाधव यांच्याशी देखील अरेरावी करत तो थेट विनापरवानगी कोविड कक्षात दाखल झाला. त्याने पीपीई किट, फेस मास्क, हॅन्डग्लोज न घालताच त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने घेतले. त्यानंतर तो रुग्णालयातून बाहेर पडला.

या घटनेनंतर रुग्णालय अधीक्षक असलेले डॉ. वैभव सोनार यांना माहिती मिळाली. हा प्रकार गंभीर असल्याने त्यांनी तातडीने वरिष्ठांच्या परवानगीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. डॉ. सोनार यांच्या तक्रारीवरून वृद्धेच्या मुलाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, रुग्णालयातील डॉक्टर तसेच नर्सिंग स्टाफशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.