ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम - कोरोनाचा उद्रेक जळगाव बातमी

जळगाव जिल्हा प्रशासनाला बुधवारी रात्री ७२९० तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. त्यात ९९६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ७३५७१ इतकी झाली आहे. तर ५३२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही ६३५५९ वर पोहचली आहे.

जळगाव रुग्णालय
जळगाव रुग्णालय
author img

By

Published : Mar 17, 2021, 10:30 PM IST

जळगाव- जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक कायम आहे. बुधवारी (आज) दिवसभरात पुन्हा ९९६ नवे बाधित रुग्ण समोर आले आहे. चिंतेची बाब म्हणजे, एकीकडे मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना दुसरीकडे कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबत नसल्याची स्थिती आहे. बुधवारी देखील दिवसभरात ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५३२ रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहे.

जळगाव जिल्हा प्रशासनाला बुधवारी रात्री ७२९० तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. त्यात ९९६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ७३५७१ इतकी झाली आहे. तर ५३२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही ६३५५९ वर पोहचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढतच असल्याने ऍक्टिव्ह रुग्णसंख्या देखील आता वाढून ८५५० झाली आहे. त्यात १८४६ रुग्ण लक्षणे असलेले तर ६७०४ रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. ऍक्टिव्ह रुग्णांपैकी ५३७० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

रिकव्हरी रेट मधे घसरत
जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असल्याने रिकव्हरी रेट सातत्याने घसरत चालला आहे. सध्या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८६.३९ टक्के आहे. दुसरीकडे मृत्यूदर देखील २.१५ इतका असून, आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवणारा आहे.

जळगावात बुधवारी काहीसा दिलासा, पण स्थिती चिंताजनकच
जळगाव शहर हे जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट आहे. शहराची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. बुधवारी मात्र, काहीसा दिलासा मिळाला. जळगावात २१७ रुग्ण आढळले आहे. जळगाव पाठोपाठ जिल्ह्यातील चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, चाळीसगाव, एरंडोल या तालुक्यांमध्ये देखील परिस्थिती चिंताजनक आहे.

हेही वाचा-बापरे! राज्यात बुधवारी 23 हजार 179 नवे कोरोनाग्रस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.