ETV Bharat / state

विशेष : महामृत्यूंजय मंत्राच्या जपाने बरा होतो कोरोना; जळगावातील योगशिक्षकाचा अजब दावा

जळगावातील एका योग शिक्षकाने मात्र, महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने कोरोना बरा होतो, असा अजब दावा केला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने एका कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना योग व प्राणायामचे धडे दिले. यावेळी रुग्णांकडून महामृत्युंजय मंत्राचा जप करून घेतल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम समोर आल्याचे या योग शिक्षकाचे म्हणणे आहे.

corona-is-cured-by-the-mahamrityunjaya-mantra

author img

By

Published : Mar 14, 2021, 3:20 PM IST

जळगाव - कोरोना विषाणूच्या महामारीने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. कोरोनाला प्रतिबंध करणारी परिणामकारक लस तसेच औषधी शोधण्यात जगभरातील शास्त्रज्ञ अद्यापही गुंतले आहेत. अशातच जळगावातील एका योग शिक्षकाने मात्र, महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने कोरोना बरा होतो, असा अजब दावा केला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने एका कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना योग व प्राणायामचे धडे दिले. यावेळी रुग्णांकडून महामृत्युंजय मंत्राचा जप करून घेतल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम समोर आल्याचे या योग शिक्षकाचे म्हणणे आहे. दरम्यान, योग शिक्षकाने केलेला दावा आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खोडून काढला आहे. असा दावा करणे चुकीचे असून, कोणत्याही व्याधीवर वैद्यकीय उपचार घेणे योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे योग शिक्षकाने केलेला दावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

योगशिक्षक कृणाल महाजन
कृणाल महाजन असे दावा करणाऱ्या योग शिक्षकाचे नाव असून, ते जळगावातील निर्धार योग प्रबोधिनीचे सचिव आहेत. गेल्या 4 वर्षांपासून ते जळगावात निर्धार योग प्रबोधिनीच्या माध्यमातून लोकांना योग व प्राणायामचे प्रशिक्षण देत आहेत. आपल्याकडे कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर गेल्या 9 महिन्यांपासून ते कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात जाऊन योग व प्राणायामचे धडे देत आहेत. जळगावात कोरोनाची दुसरी लाट धडकल्यानंतर सध्या ते कोविड रुग्णालयातील रुग्णांना दररोज योग व प्राणायाम शिकवत आहेत.
महाजन यांनी नेमका काय दावा केलाय?
कृणाल महाजन यांनी असा दावा केला आहे की, सध्या ते कोविड रुग्णालयातील रुग्णांना दररोज योग व प्राणायाम शिकवत आहेत. 2 दिवसांपूर्वी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांकडून महामृत्युंजय मंत्राचा जप करवून घेतला. यात असे दिसून आले की, या रुग्णालयात एक 72 वर्षीय आजोबा दाखल आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी 93 टक्के इतकी होती. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असूनही ऑक्सिजन पातळी वाढत नव्हती. मात्र, आजोबांनी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची ऑक्सिजन पातळी 98 टक्के झाली. याशिवाय त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते, इतर हालचाली देखील नेहमीप्रमाणे झाल्या. महामृत्युंजय मंत्राच्या जपामुळे हे शक्य झाले, असा महाजन यांनी दावा केला आहे. दरम्यान, भगवान शिव हे आदियोगी असून, महामृत्युंजय मंत्र हा त्यांचा मुख्य मंत्र आहे. हा मंत्र आरोग्यावर कार्य करतो, म्हणून सर्व कोविड रुग्णालयातील आयसीयूत महामृत्युंजय मंत्राची टेप चालवावी किंवा रुग्णांकडून त्याचा जप करून घ्यावा, अशी अपेक्षाही कृणाल महाजन यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा - विश्वविक्रमी मिसळ! सात तासात तयार केली सात हजार किलो मिसळ

असा दावा करणे चुकीचेच- आयएमए

योग शिक्षक कृणाल महाजन यांनी केलेला दावा चुकीचा असल्याचे आयएमएचे म्हणणे आहे. याबाबत भूमिका मांडताना आयएमएच्या जळगाव शाखेचे सचिव डॉ. स्नेहल फेगडे म्हणाले की, कोरोनासारख्या कठीण काळात असा अनसायंटिफिक दावा करायला नको. आम्ही जे मॉडर्न मेडिसीन व अ‌ॅलोपॅथिक मेडिसीनचे शिक्षण घेतले आहे, त्यात अशा प्रकारे व्याधीवर उपचार होत असल्याची नोंद नाही. कोणत्याही परिस्थितीत व्याधीवर तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनच अ‌ॅलोपॅथिक मेडिसीनद्वारेच उपचार घेतले पाहिजेत, असे सांगत डॉ. फेगडे पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृतीत आपण देवाला मानतो. काहीही संकट आले तर आपल्याला आधी देव आणि डॉक्टर आठवतात. अशा परिस्थितीत मंत्र म्हणून किंवा देवाची प्रार्थना करून एखाद्या रुग्णाच्या मानसिक स्थितीत सुधारणा होत असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो. पण त्याचा प्रपोगंडा व्हायला नको. कोरोनाबाधित रुग्णांची मानसिक स्थिती चांगली राखण्यासाठी यापूर्वी रुग्णालयांमध्ये म्युझिक थेरेपी तसेच योग व प्राणायामचे धडे दिले गेले आहेत. यामुळे रुग्णांची मानसिक स्थिती रिलॅक्स करण्यासाठी मदत होऊ शकते, असेही डॉ. स्नेहल फेगडे यांनी सांगितले.

हे ही वाचा - 'गृहमंत्री अनिल देशमुख व पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सुद्धा हकालपट्टी करा'

अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही घेतली हरकत-

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक विश्वजित चौधरी यांनी देखील योग शिक्षकाच्या दाव्याला हरकत घेतली आहे. चौधरी म्हणाले, मृत्युंजय मंत्राचा जप केल्याने कोरोना किंवा अन्य कुठला आजार बरा होतो, असा दावा करणे चुकीचे आहे. कोणत्याही प्रकारचा आजार बरा होण्यासाठी आपल्याला डॉक्टरांकडेच जायला हवे. डॉक्टर जेव्हा एखाद्या आजाराचे निदान करतात, तेव्हा ते रुग्णावर काय उपचार करायला हवा हे ठरवतात. कोणतीही गोष्ट ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून चाचपडून पाहायला हवी. एखाद्या व्यक्तीचा हा धार्मिक श्रद्धेचा भाग असू शकतो. पण ही श्रद्धा कुठवर असावी, यालाही मर्यादा आहेत, असेही विश्वजित चौधरी यांनी याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका मांडताना सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.