ETV Bharat / state

जळगावात अत्यवस्थ रुग्णसंख्येचा आलेख चढता; ऑक्सिजनची मागणीही वाढली

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा वेग कायम आहे. दररोज हजारांवर नवे बाधित रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अत्यवस्थ स्थितीतील बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने ऑक्सिजनची गरज वाढतच आहे. ऑक्सिजनची वाढती मागणी आणि प्रत्यक्ष होणारा पुरवठा यात तफावत असल्याने भविष्यात आणीबाणीची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

corona-cases-incres-
corona-cases-incres-
author img

By

Published : Apr 26, 2021, 3:07 PM IST

Updated : Apr 26, 2021, 3:20 PM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा वेग कायम आहे. दररोज हजारांवर नवे बाधित रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अत्यवस्थ स्थितीतील बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने ऑक्सिजनची गरज वाढतच आहे. ऑक्सिजनची वाढती मागणी आणि प्रत्यक्ष होणारा पुरवठा यात तफावत असल्याने भविष्यात आणीबाणीची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. जिल्हाभरात 24 तासात सुमारे 40 मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. मात्र, पुरवठा केवळ 30 ते 35 मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनचा होत असून, 8 ते 10 टनांचा तुटवडा जाणवत आहे.

जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा विचार केला तर आजच्या घडीला 11 हजारांच्या उंबरठ्यावर ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात पावणे दोन हजार रुग्ण हे ऑक्सिजन प्रणालीवर तर साधारण एक हजार रुग्ण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. या दोन्ही प्रकारातील सुमारे अडीच हजार रुग्णांसाठी 24 तासात 38 ते 40 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासते. एवढ्या ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी पुरेशा प्रमाणात लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध होणे गरजेचे आहे. परंतु, राज्यभर कोरोना संसर्गाची स्थिती बिकट असल्याने जिल्ह्यासाठी अवघा 30 ते 35 मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. जिल्ह्यासाठी 24 तासात लिक्विड ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होऊन जात असल्याने सुदैवाने अनर्थ घडलेला नाही. मात्र, जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आलेख असाच वाढता राहिला तर ऑक्सिजनची मागणी अजून वाढेल. त्या तुलनेत पुरवठा झाला नाही तर अनर्थ होण्याची भीती आहे.

जळगावात अत्यवस्थ रुग्णसंख्येचा आलेख चढता
..म्हणून वाढली ऑक्सिजनची गरज -
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जळगाव जिल्ह्यात ऑक्सिजनची फारशी मागणी नव्हती. मात्र, आता दुसरी लाट ही पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक तीव्र आणि विषाणूने स्वरूप बदलल्याने रुग्ण लवकर अत्यवस्थ होत आहेत. काही रुग्ण तर थेट अतिदक्षता विभागात दाखल करावे लागत आहेत. परिणामी ऑक्सिजनची मागणी दुप्पट किंवा तिप्पट पटीने वाढली आहे. ही लाट तीव्र असल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. हा ताण हलका करण्यासाठी खासगी रुग्णालयांना कोविड उपचाराची परवानगी दिली आहे. सद्यस्थितीत सव्वाशे खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खासगी रुग्णालयांची संख्या वाढल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.
येथून होतो लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा -
जळगाव जिल्ह्यासाठी मुरबाड (कल्याण) तसेच तळोजा (रायगड) येथील औद्योगिक क्षेत्रातून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासन सातत्याने लिक्विड ऑक्सिजन उत्पादकांच्या संपर्कात राहून साठा उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करत असते. सद्यस्थितीत 24 तासात एक टँकर उपलब्ध होत आहे. एवढा लिक्विड ऑक्सिजनचा साठा वेळ भागवत आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने कृत्रिम ऑक्सिजन उत्पादकांना केवळ आरोग्य यंत्रणेला पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

Last Updated : Apr 26, 2021, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.