ETV Bharat / state

कोरोनाग्रस्त असलेल्या 'त्या' महिलेने केलाय मुंबई-औरंगाबाद प्रवास..!

मुंगसे येथील कोरोनाग्रस्त महिला मुंबई येथे मुलांकडे गेली होती. 3 महिन्यांपूर्वी ती मुंगसे येथे मूळ गावी परतली होती. त्यानंतर ती महिला औरंगाबाद येथेही जाऊन आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. महिलेचा मुंबई-मुंगसे-औरंगाबाद व पुन्हा मुंगसे असा प्रवास झोप उडविणारा आहे.

Jalgaon corona
कोरोनाग्रस्त असलेल्या 'त्या' महिलेने केलाय मुंबई-औरंगाबाद प्रवास..!
author img

By

Published : Apr 19, 2020, 5:25 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील एका 60 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा ग्रामीण भागातही शिरकाव झाल्याने जिल्हा हादरला आहे. 'त्या' कोरोनाग्रस्त महिलेने मुंबई-औरंगाबाद प्रवास केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू केल्या असून, अमळनेर तालुक्यात 3 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यात येत असून, आतापर्यंत 14 जणांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

मुंगसे येथील महिलेचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणेचे वैद्यकीय पथक आज सकाळीच मुंगसे येथे दाखल झाले. मुंगसेसह परिसरातील 7 किलोमीटर अंतरावरील गावे सील करण्यात आली आहेत. या महिलेच्या संपर्कातील सुमारे 14 जणांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे. त्यात 12 जण मुंगसेचे असून, सावखेडा येथील 1 डॉक्टर व त्यांच्या पत्नी असे 2 जण आहेत. वैद्यकीय पथकाकडून होम टू होम ग्रामस्थांची तपासणी सुरू झाली आहे. डॉ. प्रकाश ताळे, डॉ. आशिष पाटील, डॉ. प्रशांत कुळकर्णी, डॉ. संजय पाटील, गटविकास संदीप वायाळ, हवालदार प्रभाकर पाटील यांचे पथक तपासणी करीत आहे. मुंगसे येथील महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताळे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी शनिवारी रात्री तातडीची बैठक घेऊन मुंगसे व परिसरातील गावांमध्ये युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. आज सकाळी पोलीस ताफ्यासह वैद्यकीय तसेच महसूल पथक दाखल झाले आहे. मुंगसे, रुंधाटी, सावखेडा, दापोरी या गावांमध्ये टीसीएलची फवारणी करण्यात आली आहे.

कोरोनाग्रस्त महिलेचा मुंबई-औरंगाबाद प्रवास -

मुंगसे येथील कोरोनाग्रस्त महिला मुंबई येथे मुलांकडे गेली होती. 3 महिन्यांपूर्वी ती मुंगसे येथे मूळ गावी परतली होती. त्यानंतर ती महिला औरंगाबाद येथेही जाऊन आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. महिलेचा मुंबई-मुंगसे-औरंगाबाद व पुन्हा मुंगसे असा प्रवास झोप उडविणारा आहे. त्या महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर तिने सावखेडा येथील एका डॉक्टरकडे उपचार केले होते. त्यानंतर चोपडा येथील एका खासगी रुग्णालयात ती महिला उपचार घेत होती. प्रकृती अधिक खालावल्याने शुक्रवारी ती महिला जळगाव येथे दाखल झाली होती. तिचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाला असून, तिला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमळनेर तालुक्यात 3 दिवस संचारबंदी -

शनिवारी रात्री मुंगसेच्या महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याने अमळनेर तालुका पूर्णपणे हादरला आहे. विशेष करून, ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत. काल मध्यरात्रीपासून ग्रामीण भागातही गल्ल्या लॉक करण्यात आल्या आहेत. शहरातही 3 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हॉस्पिटल वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहे. पोलिसांची गस्त सुरू असून, जो बाहेर दिसेल त्यावर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.