ETV Bharat / state

खडसेंचा विधानपरिषद निवडणूकीबाबत मोठा गौप्यस्फोट, 'या' पक्षाने दिली होती ऑफर

author img

By

Published : May 11, 2020, 8:38 PM IST

Updated : May 12, 2020, 9:36 AM IST

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विधानसभेनंतर विधानपरिषदेलाही पक्षाकडून तिकिट नाकारण्यात आले आहे.

Congress offers Legislative Council to Eknath Khadse
एकनाथ खडसे यांना काँग्रेसकडून विधानपरिषदेची ऑफर

जळगाव - विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती. भाजपच्या 6 ते 7 आमदार मला मतदान करणार होते. त्यांनी स्वतः माझ्याकडे असे मान्य केले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने तिकिट कापल्यानंतर एकनाथ खडसे दररोज नवनवे गौप्यस्फोट करत आहेत. आज (सोमवार) दुपारी त्यांनी मुक्ताईनगर येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी पुन्हा एक मोठा गौप्यस्फोट करत राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... विधानपरिषद निवडणूक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या निवड समितीने ज्या इच्छुकांच्या नावांच्या शिफारशी केल्या होत्या, त्यात आता ज्या चार जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यांची नावे नव्हती. त्यात माझ्यासह इतर तिघांची नावे होती. मात्र, निवड समितीने दिलेली नावे अंतिमतः वगळून नव्या लोकांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यावर पक्षाने शिक्कामोर्तब केले, असेही खडसे यांनी सांगितले आहे.

'राज्यसभेच्या वेळी आम्हाला सांगण्यात आले होते की, तुम्हाला आता नाही तर विधानपरिषदेवर संधी दिली जाईल. मात्र, आताही आमची नावे निवड समितीत असूनही आम्हाला संधी नाकारण्यात आली आणि दगाफटका झाला. याचे दुःख वाटत नाही. परंतु पक्षात अनेक निष्ठावान असताना ज्यांनी पक्षाला शिव्या घातल्या, पक्षविरोधी कारवाया केल्या, अशा लोकांना संधी दिल्याने वाईट वाटले. हा एक प्रकारे निष्ठावंतांवर अन्याय आहे' असे खडसे यांनी म्हटले आहे.

..पण मी काँग्रेसची ऑफर नाकारली - खडसे

'काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती. भाजपच्या 6 ते 7 आमदारांनी देखील क्रॉस वोटींग करण्याचे माझ्याकडे मान्य केले होते. परंतु, मी काँग्रेसची ऑफर नाकारत काँग्रेसकडून उभे राहण्यास नकार दिला' असा गौप्यस्फोट यावेळी एकनाथ खडसे यांनी केला.

हेही वाचा... विधानपरिषद निवडणूक : 9 जागांसाठी आत्तापर्यंत तब्बल २२ अर्ज दाखल

Last Updated : May 12, 2020, 9:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.