ETV Bharat / state

तिरंग्याचा अपमान करणारे आज देशावर राज्य करताहेत, काँग्रेस महिला नेत्याचे मोदी सरकारवर टीकास्त्र

'ज्या लोकांनी आजपर्यंत तिरंग्याचा अपमान केला, ज्यांनी कधी तिरंगा फडकवला नाही, ते आज देशावर राज्य करत आहेत', असं काँग्रेस नेत्या आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

जळगाव
जळगाव
author img

By

Published : Aug 7, 2021, 5:18 PM IST

जळगाव - ज्या लोकांनी आजपर्यंत तिरंग्याचा अपमान केला, ज्यांनी कधी तिरंगा फडकवला नाही, ते आज देशावर राज्य करत आहेत. तुमचं-आमचं बोलण्याचं स्वातंत्र्य देखील या लोकांनी हिरावून घेतले आहे, अशा शब्दात काँग्रेस नेत्या तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर (minister yashomati thakur) यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागले.

यशोमती ठाकूर

स्वातंत्र्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त 'व्यर्थ न हो बलिदान' चळवळ

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने 'व्यर्थ न हो बलिदान' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशव्यापी चळवळ काँग्रेसने उभारली आहे. यानिमित्ताने स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. याच अनुषंगाने आज (7 ऑगस्ट) जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे धनाजी नाना महाविद्यालयात यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या.

'आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा'

'तुमचा फोन याठिकाणी आहे. पेगाससमुळे आपली खडानखडा माहिती त्यांना होते. ज्यावेळी देशाच्या सीमांवर देशविघातक कारवाया होतात, त्याची माहिती व्हावी. देश सुरक्षित रहावा. शत्रूंवर वार करता यावा म्हणून पेगासस सारख्या सॉफ्टवेअरचा उपयोग होतो. पण आज केंद्रातल्या मोदी सरकारने त्याचा दुरुपयोग करून आपल्याला संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. या देशात सुख-समृद्धी नांदावी म्हणून आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले आहे. पण आज काय परिस्थिती आहे, खरंच देशात सुख-समृद्धी आहे का? पण आज केंद्रातल्या मोदी सरकारने देश विकायला काढला आहे. असे असताना आपण गप्प बसलो आहोत. हे स्वातंत्र्य आपल्याला अखंडपणे काम करण्यासाठी मिळाले आहे, हे प्रत्यकाने लक्षात घ्यायला हवे. म्हणून तुम्हाला-आम्हाला जागे व्हावे लागणार आहे. कारण आपला करार हा काही एका व्यक्तीसोबत किंवा देशासोबत नाही तर आपला करार हा नियतीसोबत आहे. त्यामुळे आज अन्याय, अत्याचार होत असताना, संविधानाचा पावलोपावली अपमान होत असताना तुम्ही बोलत नाही. तुमचा आत्मा दुखत नाही तेव्हा नियतीच्या कराराचा भंग आपण करतोय, हे लक्षात घ्या', असे यशोमती म्हणाल्या.

'...म्हणून आली कोरोना महामारी'

'आपण नियतीशी करार केला आहे. देशाला निरोगी ठेवण्याची शपथ घेतली आहे. पण आज नियतीचा करार पाळला नाही म्हणून काय झालं असं वागलो तर कोरोनासारखी महामारी आली. कोरोना आपल्याकडे येऊ नये म्हणून राहुल गांधी ओरडून ओरडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची केंद्र सरकारला विनंती करत होते. पण त्यांच्याकडे केंद्राने दुर्लक्ष केले', असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

'हॅलो ट्रम्पमुळे अनेकांचे बळी'

''हॅलो ट्रम्प'सारखे कार्यक्रम केले. त्यामुळे कितीतरी लोक कोरोनाला बळी पडले. नितिमत्ता न पाळणारे लोक केंद्रात बसले आहेत. यांना मरकज कार्यक्रम दिसतो. पण ट्रम्प दिसत नाहीत. दुसरी लाट आली तेव्हा कुंभमेळा नाही दिसला', अशी टीकाही यशोमती ठाकूर यांनी केली.

'देशातली घाण साफ करायला हाती खराटा घ्या'

'भूतकाळात फैजपूर येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले होते. या अधिवेशनात संत गाडगेबाबा यांनीही सहभाग घेतला होता. त्यांनी स्वच्छतेचा नारा दिला होता. त्याच अनुषंगाने, आज तुम्ही सर्वांनी हाती खराटा घेऊन देशातली घाण साफ करा. ते आमचे शत्रू नाहीत, पण त्यांनी देशाला भरकटून टाकले आहे. आज जर आपण जागे झालो नाहीत, या मातीच्या सुगंधाला जपले नाही; तर संपूर्ण देश घाण होऊन जाईल', असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

...तर जनता केंद्र सरकारला हाकलून लावेल - विनायक देशमुख

'आता सुराज्य आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, असे केंद्र सरकारला सांगायची आज वेळ आली आहे. जुलमी ब्रिटिश राजवटीला हाकलून लावण्याचा आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे. आज केंद्र सरकार जर सुराज्य ही संकल्पना समजून घेणार नसेल तर जुलमी ब्रिटिश राजवटीप्रमाणे केंद्र सरकारला पण हाकलून लावल्याशिवाय देशवासीय स्वस्थ बसणार नाहीत. आज केंद्र सरकारच्या अत्याचाराला जनता कंटाळली आहे. त्यामुळे ही सत्ता जोपर्यंत उलथवून टाकली जात नाही, तोपर्यंत काँग्रेसचा लढा सुरू असेल. आज जागतिक पातळीवर भारत देशाची ओळख धगधगणारे स्मशान, गंगेत वाहणारी प्रेतं असणारा देश अशी झाली आहे. याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. देशातील शेतकरी अडचणीत आले आहेत. पण केंद्र सरकारला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आता शेतकरी आंदोलन देशव्यापी झाले आहे. त्याला निश्चित यश येईल, असा विश्वास आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचा मोठा वाटा आहे. अनेकांनी आपले बलिदान दिले. याउलट आज केंद्रात सत्ताधारी असलेल्या कोणाचाही देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात वाटा नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने 'व्यर्थ न हो बलिदान' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशव्यापी चळवळ काँग्रेसने उभारली आहे', असे विनायक देशमुख म्हणाले.

छायाचित्र प्रदर्शनाला भेट -

यावेळी यशोमती ठाकूर यांनी फैजपूर येथे 1936 साली भरलेल्या काँग्रेसच्या ग्रामीण अधिवेशनाच्या छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी प्रेरणास्तंभाला अभिवादन केले. या निमित्ताने काँग्रेसच्या ग्रामीण अधिवेशनाच्या आठवणींना उजाळा मिळाल्याची भावना देखील ठाकूर यांनी व्यक्त केली. दरम्यान, कार्यक्रमात ऍड. ठाकूर यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांची मोदी सरकारवर टीका

दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. 'बसमधील कंडक्टर प्रवाशांना सारखा आगे बढो...आगे बढो सांगत असतो. असेच आगे बढो... आगे बढो म्हणत देशाला पुढे नेणारा पंतप्रधान पाहिजे', असा टोला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावला आहे.

हेही वाचा - आरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकार जबाबदारी झटकत आहे - वडेट्टीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.