ETV Bharat / state

रावेरला दोन गटांमध्ये तुफान राडा, 3 जखमी तर 7 वाहनांची जाळपोळ, संचारबंदी लागू - जळगाव दंगल

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले असून, 7 वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

jalgaon raver conflict
रावेरला दोन गटांमध्ये तुफान राडा, 3 जखमी तर 7 वाहनांची जाळपोळ, संचारबंदी लागू
author img

By

Published : Mar 23, 2020, 1:43 AM IST

Updated : Mar 23, 2020, 2:12 AM IST

जळगाव - जिल्ह्यातील रावेर येथे दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले असून, 7 वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

jalgaon raver conflict
रावेरला दोन गटांमध्ये तुफान राडा, 3 जखमी तर 7 वाहनांची जाळपोळ, संचारबंदी लागू

हेही वाचा - धक्कादायक! मुलगी पळवल्याच्या संशयावरून कुटुंबावर प्राणघातक हल्ला; एकाची हत्या, दोघे गंभीर

रविवारी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे सर्वत्र अघोषित संचारबंदी होती. मात्र, सायंकाळी अचानक दोन गटात हाणामारी सुरू झाली होती. कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ केली. यामुळे रावेर शहरात प्रचंड तणाव आहे. ही घटना होताच पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित झाला.

अंधारातच पोलिसांना घटनास्थळी जावे लागले. तिथपर्यंत जाण्यासाठी त्यांना विलंब झाला. पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केल्यानंतरही दंगल नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांनी 3 फैरी झाडल्या. त्यानंतर हाणामारीवरा नियंत्रण ठेवण्यात यश आले. याआधी 24 डिसेंबर सन 2012 रोजी याच भागात असाचा प्राकार घडला होता. तर रविवारी रात्री झालेल्या संघर्षामध्ये रसलपूर येथील युवक जखमी झाल्याने त्या गावातही तणावाचे वातावरण होते. ही माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. अधिकारी रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते.

jalgaon raver conflict
रावेरला दोन गटांमध्ये दंगल, 3 जखमी तर 7 वाहनांची जाळपोळ

यामध्ये जावेद सलीम (वय-25), डिगंबर अस्वार (वय-55), नीलेश भागवत जगताप (वय-26, रा. रावेर) हे गंभीर जखमी झाले आहेत.

रावेर, यावल, फैजपूर, सावदा पालिकेचे बंब मागवून आग विझवण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी रावेरात तळ ठोकून आहेत.

Last Updated : Mar 23, 2020, 2:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.