ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींसाठी आचारसंहिता लागू; सरपंचासाठी आरक्षण सोडत

शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे हालचाली सुरू झाल्या असून, आचाररसंहिता लागू करण्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. जळगाव तालुक्यातील आसोदा, आव्हाणे, ममुराबाद, म्हसावद, शिरसोली, मोहाडी, नशिराबाद या मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जोरदार चुरस पाहायला मिळेल.

Code of Conduct applied for 783 Gram Panchayats in Jalgaon district
जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींसाठी आचारसंहिता लागू; सरपंचासाठी आरक्षण सोडत
author img

By

Published : Dec 11, 2020, 10:03 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जातील. त्यांची छाननी ही ३१ डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारीपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हवाटप होईल. दुसरीकडे २२, २३ आणि २४ रोजी सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत निघणार आहे. ही सोडत तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली होईल, तर महिला आरक्षण सोडत ही प्रांतांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

राजकीय मोर्चेबांधणीला वेग येणार-

शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे हालचाली सुरू झाल्या असून, आचाररसंहिता लागू करण्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. जळगाव तालुक्यातील आसोदा, आव्हाणे, ममुराबाद, म्हसावद, शिरसोली, मोहाडी, नशिराबाद या मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जोरदार चुरस पाहायला मिळेल. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आत्तापासून मोर्चेबांधणी आणि राजकीय घडामोडींबाबत चर्चा रंगू लागली आहे. कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु, आता राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा केल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय पक्षांच्या वतीने मोर्चेबांधणीला काही दिवसात वेग येणार आहे.

निवडणूक जाहीर झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती अशा-

जळगाव - ४३

जामनेर - ७३

एरंडोल - ३७

धरणगाव - ४७

भुसावळ - २६

मुक्ताईनगर - ४९

यावल - ४८

बोदवड - ३०

रावेर - ४८

अमळनेर - ६७

पारोळा - ५८

चोपडा - ५२

पाचोरा - ९६

भडगाव - ३३

चाळीसगाव - ७६

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.