ETV Bharat / state

जळगावात ४ लाख किंमतीचे सिगारेटचे बॉक्स चोरी, आरोपी गजाआड - Cigarette theft Jalgaon

सागर पाटील याने ३० जून ते १९ ऑक्टोंबर पर्यंत दुकानातून वेळोवेळी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दुकानातील फोर स्न्वेअर सिगारेटचे १२० बॉक्स, मालबोरो सिगारेटचे ७०, असे एकूण ३ लाख ९० हजार रुपये किंमतीचे १२० बॉक्स लंपास केले.

जळगावात ४ लाखाची सिगारेटची चोरी
जळगावात ४ लाखाची सिगारेटची चोरी
author img

By

Published : Oct 29, 2020, 10:23 PM IST

जळगाव- शहरातील चोपडा मार्केटमध्ये काम करणार्‍या दुकानातील कामगाराने दुकानात विक्रीसाठी ठेवलेले ४ लाखाचे सिगारेटचे बॉक्स लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सिगारेट लांबवणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. सागर पाटील (वय २४ रा. मानवसेवा शाळा, खोटेनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दादावाडी परिसरातील वृद्धांवन कॉलनीतील रहिवासी रामचंद्र पुंडलीक पाटील यांचे भजे गल्लीतील चोपडा मार्केटमध्ये भारद्वाज एजन्सी नावाचे सिगारेट विक्रीचे दुकान आहे. रामचंद्र यांच्याकडे सागर जयंत पाटील हा युवक कामाला होता. रामचंद्र पाटील यांचा सागरवर विश्‍वास संपादन झाल्यामुळे त्यांनी सिगारेट विक्रीची जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती.

सागर पाटील याने ३० जून ते १९ ऑक्टोंबर पर्यंत दुकानातून वेळोवेळी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी दुकानातील फोर स्न्वेअर सिगारेटचे १२० बॉक्स, मालबोरो सिगारेटचे ७०, असे एकूण ३ लाख ९० हजार रुपये किंमतीचे १२० बॉक्स लंपास केले.

संशयित आरोपीने पुरावा नष्ट केला

सिगारेट विक्री करणार्‍या दुकानातील मालाच्या खरेदी-विक्रीची दरारोज वहीमध्ये नोंद केली जात होती. सागरने त्याच्या आर्थिक फायद्यासाठी नोंद करणार्‍या वहीत खाडाखोड केलेली होती. तर, पुरावा मिळू नये म्हणून एक वही फेकून दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रामचंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून सागर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपीला ३१ पर्यंत पोलीस कोठडी

जिल्हापेठ पोलिसात फसवणुकीसह चोरीचा गुन्हा दाखल होताच सागर जयंत पाटील (वय २४ रा. मानवसेवा शाळा, खोटेनगर) याला अटक करण्यात आली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला ३१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा- बडतर्फ कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांचा आयुक्तांसमोर आक्रोश; मृतदेह आणला महापालिकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.