जळगाव: बिहार राज्यातून सांगलीकडे 59 मुलांची तस्करी केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळ रेल्वे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दानापूर पुणे एक्सप्रेस मधून भुसावळ व मनमाड रेल्वे पोलिसांकडून 59 मुलांची सुटका करण्यात आली आहे. बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यातून सांगली येथे मदरशाकडे या मुलांची तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली. रेल्वे पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेत या मुलांची जळगाव व नाशिक येथील बाल रक्षगृहामध्ये रवानगी केली आहे.
मुलांचे वय 8 ते 15 वर्ष: कायदेशीर प्रक्रियेनंतर संबंधित मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देणार असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने सांगण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांचे वय 8 ते 15 वर्ष दरम्यान असून याप्रकरणी चार संशयतांना देखील रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतली असल्याची माहिती आहे.
अशी घडली घटना : मिळालेल्या माहितीनुसार, हे मुले 8 ते 18 वयोगटातील आहेत. बिहारमधून त्यांना सांगलीच्या मदरशात आणले जात होते. जनरल तिकीट घेऊन मुले आणि त्यांच्या सोबत असलेले 4 जण आरक्षित रेल्वेच्या डब्यात चढल्यामुळे प्रवाशांनी त्यांची तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानंतर त्या प्रकरणात हस्तक्षेप केला. पोलिसांनी मुलांची चौकशी केल्यानंतर तस्करीचा प्रकार आला उघडकीस आला. दरम्यान रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन सर्व मुलांची नाशिकच्या बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. सोबत असलेल्या 4 जणाविरुद्ध मनमाड रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा करण्यात दाखल करण्यात आला आहे.
प्रवाशाच्या तक्रारीनंतर प्रकरण उघडकीस : या मुलांना बिहारहून आलेल्या दानापूर एक्स्प्रेसमध्ये बसवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यासोबत या ट्रेनमध्ये अन्य ५ जणही होते, जे त्यांना पुण्याला घेऊन येत होते. मुलांच्या आरक्षित डब्यात पोहोचल्यावर एका प्रवाशाने ट्विट करून रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वेच्या डब्यात काही मुले असल्याचे प्रवाशाने रेल्वे पोलिसांना सांगितले. जे भुकेले आणि तहानलेले दिसत आहेत. कृपया त्यांना मदत करा. याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडीची तपासणी केली. 29 मुलांना जागीच ट्रेनमधून उतरवण्यात आले. पोलिसांनी त्यांच्यासह 1 मौलवीलाही अटक केली आहे. यानंतर रेल्वे पोलिसांनी मनमाड रेल्वे स्थानकावर पुन्हा गाडीची तपासणी केली असता त्यात आणखी ३१ अल्पवयीन मुले आढळून आली. पोलिसांनी त्यांनाही रेल्वेतून सुखरूप बाहेर काढले. या मुलांसोबत प्रवास करणाऱ्या अन्य चार जणांनाही अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -