ETV Bharat / state

मेहरूण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

author img

By

Published : Oct 31, 2019, 7:54 PM IST

कुणाल हा जयदुर्गा माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. गुरुवारी सकाळी तो सिंधी कॉलनीत त्याच्या मावशीकडे आला होता. तेथून घरी गेल्यानंतर पुन्हा 2 मित्रांसह तो मेहरुण तलावात पोहण्यासाठी गेला होता.

मेहरूण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

जळगाव - मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. कुणाल कैलास चव्हाण (वय 12, रा. सिद्धार्थनगर, रामेश्वर कॉलनी) असे मृत बालकाचे नाव आहे.

हेही वाचा - जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला 25 लाखांचा दंड; नियमांचे उल्लंघन केल्याने रिझर्व्ह बँकेची कारवाई

कुणाल हा जयदुर्गा माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. गुरुवारी सकाळी तो सिंधी कॉलनीत त्याच्या मावशीकडे आला होता. तेथून घरी गेल्यानंतर पुन्हा 2 मित्रांसह तो मेहरुण तलावात पोहण्यासाठी आला. सांडव्याच्या बाजुने पोहण्यासाठी त्याने पाण्यात उडी घेतली. खोलीचा अंदाज न आल्याने तसेच गाळात रुतल्यामुळे कुणाल पाण्यातून बाहेर येऊ शकला नाही. त्यावेळी बाहेर उभ्या असलेल्या दोन्ही मित्रांनी आरडाओरड करुन लोकांना गोळा केले.

हेही वाचा - जळगावमध्ये परतीच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान

काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनी थोड्याच वेळात कुणालला बाहेर काढले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत कुरकुरे यांनी तपासणी करुन कुणालला मृत घोषित केले. शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी डॉ.कुरकुरे यांच्या माहितीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कुटुंबीयांचा आक्रोश-

या घटनेची माहिती मिळताच चव्हाण कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. कुणालच्या मृत्यूमुळे त्यांना प्रचंड धक्का बसला. यावेळी कुटुंबीय, नातेवाईकांनी रुग्णालयातच प्रचंड आक्रोश केला. मुळचे भामपूर (ता. शिरपूर) येथील चव्हाण कुटुंबीय 7 वर्षांपूर्वी जळगावात स्थायिक झाले आहेत. कुणाल याच्या पश्चात आई-वडील, व 2 भाऊ असा परिवार आहे.

पोहण्यासाठी तलावात जावू नये -

यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे नद्या, नाले, तलाव सर्वच फुल भरलेले आहेत. मेहरुण तलाव देखील पुर्णपणे भरलेला असल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पाण्यात पोहण्याचा अंदाज देखील चुकू शकतो. अशात नागरिकांनी तलावात पोहण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Intro:जळगाव
मित्रांसाेबत पोहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय बालकाचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली. कुणाल कैलास चव्हाण (वय १२, रा. सिद्धार्थनगर, रामेश्वर कॉलनी) असे मृत बालकाचे नाव आहे.Body:कुणाल हा जयदुर्गा माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. गुरुवारी सकाळी तो सिंधी कॉलनीत त्याच्या मावशीकडे आला होता. तेथून घरी गेल्यानंतर पुन्हा दोन मित्रांसह मेहरुण तलावात पोहण्यासाठी आला. सांडव्याच्या बाजुने पोहण्यासाठी त्याने पाण्यात उडी घेतली. खोलीचा अंदाज न आल्याने तसेच गाळात रुतल्यामुळे कुणाल पाण्यातून बाहेर येऊ शकला नाही. बाहेर उभ्या असलेल्या दोन्ही मित्रांनी आरडाओरड करुन लोकांना गोळा केले. काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनी थोड्याच वेळात कुणालला बाहेर काढले. परंतु, तो पर्यंत उशीर झाला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डाॅ.हेमंत कुरकुरे यांनी तपासणी करुन कुणालला मृत घोषित केले. शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी डॉ.कुरकुरे यांच्या खबरीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कुटुंबीयांचा आक्रोश-

ही घटना कळताच चव्हाण कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. कुणालच्या मृत्यूमुळे त्यांना प्रचंड धक्का बसला होता. यावेळी कुटुंबीय, नातेवाईकांनी रुग्णालयातच प्रचंड आक्रोश केला. मुळचे भामपूर (ता. शिरपूर) येथील चव्हाण कुटुंबीय सात वर्षांपूर्वी जळगावात स्थायिक झाले आहे. मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. कुणाल याच्या पश्चात आई-वडील, व दोन भाऊ असा परिवार आहे.Conclusion:तलाव झाला धोकादायक-

यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे नद्या, नाले, तलाव सर्वच फुल भरलेले आहेत. मेहरुण तलाव देखील पुर्णपणे भरलेला असल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे पाण्यात पोहण्याचा अंदाज देखील चुकू शकतो. अशात नागरिकांनी तलावात पोहण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.