ETV Bharat / state

रेल्वेत नोकरीचे आमिष देत महिलेची फसवणूक; पिता-पुत्रावर गुन्हा दाखल - जळगाव पोलीस न्यूज

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमीष देत पिता-पुत्राने एका महिलेस सात लाख रुपयांत गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिता-पुत्राविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर वामन पाटील व आकाश मनोहर पाटील (रा. वडगाव, ता. रावेर) अशी दोघांची नावे आहेत.

Cheating on a woman by offering her a job in the railways; Father and son charged
रेल्वेत नोकरीचे आमिष देत महिलेची फसवणूक; पिता-पुत्रावर गुन्हा दाखल
author img

By

Published : Jul 23, 2020, 4:33 PM IST

जळगाव - रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमीष देत पिता-पुत्राने एका महिलेस सात लाख रुपयांत गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी ठाण्यात पिता-पुत्राविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर वामन पाटील व आकाश मनोहर पाटील (रा. वडगाव, ता. रावेर) अशी दोघांची नावे आहेत.

cheating-on-a-woman-by-offering-her-a-job-in-the-railways-father-and-son-charged

योगिता ऋषीकेश खैरनार (वय ४०) रा. न्यु सम्राट कॉलनी, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना वर्षा व श्वेता या दोन मुली असुन दोघी सध्या बेरोजगार आहेत. श्वेताचा मित्र आकाश याचे वडील रेल्वेत टीसी पदावर कार्यरत आहेत. २०१८ मध्ये त्याने वर्षाला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमीष योगिता यांना दिले. त्याच्या बोलण्यात येऊन योगिता यांनी आकाशला सुरूवातीला फॉर्म भरण्यासाठी १० हजार रुपये दिले. यानंतर आकाश व त्याच्या वडीलांनी वेळोवेळी करुन योगिता यांच्याकडून सात लाख रुपये घेतले. मधल्या काळात आकाशने एक बनावट जॉईनिंग लेटर देखील बनवून देखील दिले. परंतु, वर्षाने रुजू होण्याच्या आधीच ‘कुणीतरी फोन लावल्याने आता रुजू करता येणार नाही’ अशी थाप मारली. नोकरी न मिळाल्याने योगिता यांनी आकाशकडे पैसे परत मागण्याचा तगादा लावला. मात्र, आकाशने पैसे देण्यास नकार दिला व पैसे परत मागितल्यास जीवाचे बरेवाईट करुन घेईल अशी धमकीही दिली.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये 24 वाहनांची तोडफोड; तिघे पोलिसांच्या ताब्यात

हा सर्व प्रकार योगिता यांनी आकाशच्या वडीलांना सांगितला मात्र, ‘आकाशला मी ओळखत नाही, तुमचे तुम्ही बघुन घ्या’ असे उत्तर आकाशच्या वडीलांनी दिले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर योगिता यांनी जवळच्या नातेवाईकांना हा प्रकार सांगीतला. तरी देखील या दोघांनी त्यांचे पैसे परत केले नाहीत. अखेर योगिता यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.