ETV Bharat / state

बीएचआर पतसंस्था घोटाळा : 14 संचालकांविरुद्ध जळगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी राज्यभरातील ८१ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यातील अमरावती, परभणी, लातूर, सांगली व पुण्यात दाखल ७ गुन्ह्यांमध्ये आज (मंगळवारी) संस्थापक प्रमोद रायसोनी यांच्यासह १४ संचालकांवर जळगाव जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था
बीएचआर पतसंस्था घोटाळा : 14 संचालकांविरुद्ध जळगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
author img

By

Published : Dec 8, 2020, 7:58 PM IST

जळगाव - भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी राज्यभरातील ८१ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यातील अमरावती, परभणी, लातूर, सांगली व पुण्यात दाखल ७ गुन्ह्यांमध्ये आज (मंगळवारी) संस्थापक प्रमोद रायसोनी यांच्यासह १४ संचालकांवर जळगाव जिल्हा न्यायालयातील पहिले तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. दरम्यान, सर्व आरोप संशयितांनी नाकारले आहेत. बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पतसंस्थेच्या संचालकांविरोधात राज्यभरात ८१ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था
बीएचआर पतसंस्था घोटाळा : 14 संचालकांविरुद्ध जळगाव न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

त्यातील अमरावती, परभणी, लातूर, सांगली व पुण्यात दाखल असलेल्या ७ गुन्ह्यांमध्ये हे दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. बीएचआर पतसंस्थेच्या राज्यभरात दाखल असलेल्या गुन्ह्यांची सुनावणी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे. त्या अनुषंगाने तपास पूर्ण झालेल्या ७ गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात आले. जिल्हा कारागृहात बंदी असलेले संचालक प्रमोद रायसोनीसह १४ जणांना मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यावर विविध ७ कलमांखाली दोष ठेवण्यात आले आहेत. जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांनी हे दोषारोप सादर केले. संशयितांतर्फे अॅड. अकिल इस्माईल यांनी काम पाहिले.

१४ संचालकांमध्ये दिग्गजांचा समावेश

प्रमोद भाईचंद रायसोनी, दिलीप कांतीलाल चोरडिया, सुरजमल बभुतमल जैन, मोतीलाल ओंकार जिरी, यशवंत ओंकार जिरी, राजाराम काशिनाथ कोळी, इंद्रकुमार आत्माराम ललवाणी, डॉ. हितेंद्र यशवंत महाजन, भागवत संपत माळी, दादा रामचंद्र पाटील, शेख रमजान शेख अब्दुल नबी, भगवान हिरामण वाघ, सुकलाल शहादू माळी, लिलाबाई राजू सोनवणे यांचा १४ संचालकांमध्ये समावेश आहे. हे सर्व जण सध्या जिल्हा कारागृहात बंदी आहेत.

सर्वांनी दोष नाकारले

दोषारोप ठेवल्यानंतर सरकारी व संशयितांच्या वकिलांनी युक्तीवाद केला. तसेच न्यायालयाने सर्व १४ संशयितांना त्यांच्याविरुद्ध ठेवण्यात आलेल्या कलमांचे विश्लेषण करण्यात सांगितले. यावेळी संशयितांनी त्यांच्यावर ठेवलेले सर्व दोष नाकारले आहेत. गुन्हा केला नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.