जळगाव - मध्य रेल्वेच्या सामग्री व्यवस्थापन विभागाने मध्य रेल्वेच्या प्रत्येक विभाग, कार्यशाळा, शेड आदी परिसर भंगार सामग्रीपासून मुक्त व्हावे, यासाठी 'झिरो स्क्रॅप मिशन' सुरू केले. चालू वर्षात मध्य रेल्वेने 224.96 कोटी भंगाराची विक्री केली. या भंगार सामग्रीमध्ये निरुपयोगी रूळ, रुळांचे साहित्य, मोडीत काढलेले डबे, वाघिणी आणि इंजिने आदींचा समावेश आहे.
इतका महसूल जमा -
'झिरो स्क्रॅप मिशन' मोहिमेमुळे केवळ भारतीय रेल्वेचीच कमाई होते. वर्ष 2019-20 या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने 56057.15 मेट्रीक टन वजनाच्या निरुपयोगी रूळ, रुळांचे साहित्य आदी भंगार साहित्याच्या विक्रीतून रुपये 321.46 कोटी महसूल जमा केला होता.
सामग्री व्यवस्थापन विभागाची महत्त्वपूर्ण भुमिका -
कोविड -19 साथीच्या दरम्यान देशभरात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात मध्य रेल्वेच्या सामग्री व्यवस्थापन विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पीपीई किट्स, एन-95 मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर्स इत्यादी वस्तू विविध ठिकाणी पोहोचवण्यात आल्या.
हेही वाचा - शशी थरुर यांच्यासह पत्रकारांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती