ETV Bharat / state

जळगावात कृषी केंद्र फोडले; चार चोरटे सीसीटीव्हीत कैद - robbery in Agricultural Center news

शहरातील चित्राचौकात चौरसिया कृषी केंद्र नावाचे दुकान आहे. याठिकाणी कृषी किटकनाशके आदींची विक्री केली जाते. दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी शटर उचकटून गल्ल्यातील रक्कम लंपास केली आहे.

चौरसिया कृषी केंद्र
चौरसिया कृषी केंद्र
author img

By

Published : Aug 24, 2020, 5:00 PM IST

जळगाव - शहरातील चित्रा चौकातील चौरसिया कृषी केंद्र अज्ञात चार चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने फोडून गल्ल्यातील १७ ते १८ हजार रूपयांची रोकड लंपास केली आहे. पहाटे ५ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चारही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

चोरीचा सीसीटीव्ही

याबाबत माहिती अशी की, विजयकुमार रमेश चौरसिया (५०) रा. तहसील कचेरीसमोर बळीराम पेठ यांचे शहरातील चित्राचौकात चौरसिया कृषी केंद्र नावाचे दुकान आहे. याठिकाणी कृषी किटकनाशके आदींची विक्री केली जाते. दुकानाला तीन शटर आहेत. दरम्यान, आज सकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीवर चार चोरटे दुकानासमोर आले. काही वेळ दुकानाच्या पायरीजवळ बसले. आजूबाजूला टेहाळणी केली. त्यानंतर चार जणांपैकी दोघांनी कटर आणि टॉमीच्या मदतीने दुकानाचे मधले शटर उचकटून दुकानातील गल्ला स्क्रृ ड्रायव्हरने उघडला. यानंतर त्यात ठेवलेले अंदाजे १७ ते १८ हजार रुपयांची रोकड लंपास केली. हा सर्व प्रकार दुकानाच्या दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हेही वाचा - अष्टविनायक दर्शन : पृथ्वीतलावरील पहिले गणेशाचे मंदिर, जाणून घ्या मोरेश्वराची अख्यायिका

दोन दुचाकीवर आल्यानंतर दुकानाच्या पायऱ्यांसमोर एक ६० वर्षीय वृद्ध झोपलेले होते. वृद्धाने त्यांना विचारणा केली असता, चोरट्यांनी त्याला दम देऊन हाकलून लावले. ६० वर्षीय वृद्धाने पुढे जावून कृषी केंद्राचे मालक चौरसिया यांना फोनवरून चोरी होत असल्याची माहिती दिली. विजय चौरसिया तत्काळ दुकानाजवळ आले. दुकान मालक आल्याचे पाहून चारही भामटे घटनास्थळी कटर, टॉमी आणि लाल रंगाची बॅग सोडून पसार झाले.

thief
चोरट्यांनी घटनास्थळी सोडलेले ऐवज

दरम्यान, चौरसिया कृषी केंद्रासमोर कृष्णा ईलेक्ट्रीक दुकानही चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. दुकानाचे एक कुलूप तोडल्याचे दिसून आले. तसेच सराफा बाजारात काही दुकानांचे कुलूप तोडले असल्याचे बोलले जात होते. चोरी झाल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक अरूण निकम यांनी पाहणी केली.

हेही वाचा - अमिताभ यांनी सुरू केले 'कौन बनेगा करोडपती'चे शूटिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.