ETV Bharat / state

बेकायदेशीररित्या गॅस भरताना कार पेटली; अमळनेर शहरातील घटना

author img

By

Published : Feb 8, 2022, 9:26 PM IST

Updated : Feb 8, 2022, 9:44 PM IST

खासगी कारमध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरत असताना अचानक आग लागली. लागलेल्या आगीत चारचाकी वाहन जळून खाक झाल्याची घटना अमळनेर शहरातील बसस्थानकाच्या बाजूला घडली.

car fire
गॅस भरताना कार पेटली

जळगाव - खासगी कारमध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरत असताना अचानक आग लागली. लागलेल्या आगीत चारचाकी वाहन जळून खाक झाल्याची घटना अमळनेर शहरातील बसस्थानकाच्या बाजूला घडली. दरम्यान, वेळीच प्रकार लक्षात आल्यामुळे दुर्घटना टळली.

गॅस भरताना कार पेटली

काय घडलं नक्की त्यावेळी -

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील बसस्थानकाच्या बाजूला जुनी पोलीस लाईनजवळ व चोपडा रस्त्याच्या बाजूस वाहने दुरूस्ती करण्याचे दुकाने आहेत. याठिकाणी दुरूस्तीच्या कामांसह चारचाकी वाहनांमध्ये विना परवाना गॅस कीट बसविण्याचे काम सुरू असते. अशाच पद्धतीने मंगळवारी दुपारच्या सुमारास एका ओम्नी या चार चाकी वाहनात गॅस कीटच्या माध्यमातून गॅस भरण्याचे काम सुरू होते. गॅस गळतीमुळे कारने अचानक पेट घेतला. काही कळण्याच्या आत संपूर्ण उभी कार पेटली. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. आग विझवण्यात आली असून, याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Last Updated : Feb 8, 2022, 9:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.