ETV Bharat / state

गुलाबराव पाटलांचे जळगावात जंगी स्वागत; मिरवणुकीत चेंगराचेंगरी, दोन महिला शिवसैनिक जखमी - गुलाबराव पाटील यांचे जळगावात स्वागत

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढत गुलाबराव पाटीलांचे जळगावात जंगी स्वागत केले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र, यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाल्याने दोन महिला शिवसैनिक जखमी झाल्या.

Cabinet Minister Gulabrao Patil welcomes in Jalgaon
गुलाबराव पाटीलांचे जळगावात जंगी स्वागत
author img

By

Published : Jan 1, 2020, 4:34 PM IST

जळगाव - कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील हे आज (बुधवारी) दुपारी पहिल्यांदा जळगावात दाखल झाले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढत त्यांचे जंगी स्वागत केले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी तसेच बँजो बँडच्या गाण्यांवर थिरकत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, भाजपचा बालेकिल्ला भेदणाऱ्या शिवसेनेच्या वाट्याला पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपद आल्याने शिवसैनिकांनी गुलाबराव पाटलांची भव्य मिरवणूक काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

गुलाबराव पाटीलांचे जळगावात जंगी स्वागत; मिरवणूकी दरम्यान चेंगराचेंगरी, दोन महिला शिवसैनिक जखमी

हेही वाचा... ...म्हणून समृद्धी महामार्गाच्या बांधकाम कंत्राटदार कंपनीला 238 कोटींचा दंड

मुंबईहून गीतांजली एक्सप्रेसने दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास गुलाबराव पाटील यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते. रेल्वे स्थानकाच्या फलाटापासूनच कार्यकर्त्यांनी वाद्य वाजवण्यास तसेच घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी देखील झाली होती. मात्र, पोलिसांनी गर्दी पांगवल्याने अनर्थ टळला. रेल्वे स्थानकाबाहेर आल्यावर गुलाबराव पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक नेहरू पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली. त्याठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर मिरवणूक आटोपली.

हेही वाचा... काश्मीरमध्ये सरसकट मोबाईल एसएमएस सेवेसह सरकारी रुग्णालयातील इंटरनेट पूर्ववत

दरम्यान, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझ्यावर कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. जळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा आपला पहिला अजेंडा असणार आहे. सोबतच प्रशासनातील मस्तवाल अधिकाऱ्यांना वठणीवर आणून प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यावर भर असेल. अधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही तर मात्र, शिवसेना स्टाईलने त्यांच्याकडून कामे करून घेऊ, असा खणखणीत इशारा देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना दिला.

हेही वाचा... भरधाव आलिशान कार विहिरीत पडली; दोघांचा मृत्यू, तीन जखमी

गुलाबराव पाटलांच्या स्वागतावेळी रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी ; 2 महिला शिवसैनिक जखमी

कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचे दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास जळगावात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या मिरवणूकीत गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन 2 महिला पदाधिकारी जखमी झाल्या. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पाटील पहिल्यांदाच जळगावात दाखल झाले. मुंबईहून ते गीतांजली एक्सप्रेसने जळगावात पोहचले. त्यांचे स्वागत करण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गुलाबराव पाटील हे रेल्वे स्थानकातून बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात कार्यकर्त्यांच्या गराड्यात अडकलेल्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मंगला बारी आणि शोभा चौधरी या जखमी झाल्या. ही बाब काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दोघांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, गर्दीमुळे गुलाबराव पाटील हे देखील यामध्ये अडकले होते. मात्र, त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील पोलिसांनी त्यांना सुरक्षेचे कडे देत जिन्याच्या एका बाजूला केले. गर्दी ओसरल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले.

Intro:जळगाव
कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील हे आज (बुधवारी) दुपारी पहिल्यांदा जळगावात दाखल झाले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढत त्यांचे जंगी स्वागत केले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी तसेच बँजो बँडच्या गाण्यांवर थिरकत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, भाजपचा बालेकिल्ला भेदणाऱ्या शिवसेनेच्या वाट्याला पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपद आल्याने शिवसैनिकांनी गुलाबराव पाटलांची भव्य मिरवणूक काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.Body:मुंबईहून गीतांजली एक्सप्रेसने दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास गुलाबराव पाटील यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक रेल्वे स्थानकावर दाखल झाले होते. रेल्वे स्थानकाच्या फलाटापासूनच कार्यकर्त्यांनी वाद्य वाजवण्यास तसेच घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी देखील झाली होती. मात्र, पोलिसांनी गर्दी पांगवल्याने अनर्थ टळला. रेल्वे स्थानकाबाहेर आल्यावर गुलाबराव पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक नेहरू पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली. त्याठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर मिरवणूक आटोपली.Conclusion:दरम्यान, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझ्यावर कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. जळगाव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा आपला पहिला अजेंडा असणार आहे. सोबतच प्रशासनातील मस्तवाल अधिकाऱ्यांना वठणीवर आणून प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यावर भर असेल. अधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही तर मात्र, शिवसेना स्टाईलने त्यांच्याकडून कामे करून घेऊ, असा खणखणीत इशारा देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना दिला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.