ETV Bharat / state

जळगाव : शाळकरी मुलींना शिवीगाळ करणाऱ्या बस कंडक्टरला चोप; पुनखेडा गावातील प्रकार - पुनखेडा गाव

शाळकरी मुलींना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या एका बस कंडक्टरला संतप्त ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास रावेर तालुक्यातील पुनखेडा येथे घडली. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी २ तासांपर्यंत बस गावातच रोखून धरल्याने बसमधील प्रवाशांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागला.

शाळकरी मुलींना शिवीगाळ करणाऱ्या बस कंडक्टरला चोप
author img

By

Published : Aug 2, 2019, 11:04 PM IST

जळगाव - शाळकरी मुलींना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या एका बस कंडक्टरला संतप्त ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास रावेर तालुक्यातील पुनखेडा येथे घडली. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी २ तासांपर्यंत बस गावातच रोखून धरल्याने बसमधील प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

शाळकरी मुलींना शिवीगाळ करणाऱ्या बस कंडक्टरला चोप

रावेर आगाराच्या रावेर-अंतुर्ली बसमध्ये हा प्रकार घडला. शाळा सुटल्यानंतर पुनखेडा येथील काही विद्यार्थिनी या बसने घरी परत येत होत्या. बसमध्ये गर्दी असल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनी उभ्या होत्या. यावेळी काहीएक कारण नसताना बस कंडक्टरने विद्यार्थिनींना अश्लील शिवीगाळ केली. यापूर्वी देखील संबंधित कंडक्टरने असा प्रकार केलेला होता. विद्यार्थिनींनी भ्रमणध्वनीवरून बसमध्ये घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. ही बस गावात आल्यानंतर बस थांब्यावर ग्रामस्थांनी कंडक्टरला चोप दिला.

गैरप्रकार करणाऱ्या कंडक्टरवर कारवाई झाली पाहिजे म्हणून ग्रामस्थांनी बस रोखून धरली. रावेर आगाराच्या आगारप्रमुखांनी गावात येऊन याबाबत निर्णय द्यावा. तोपर्यंत बस गावातून मार्गस्थ होऊ देणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने मोठा गोंधळ उडाला. या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. तब्बल २ तास हा प्रकार सुरू होता. शेवटी बस रावेर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. याच बसफेरीवर ड्युटी करणाऱ्या महिला वाहकाकडूनदेखील शाळकरी मुलींना शिवीगाळ होत असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. ग्रामस्थांनी तक्रार नोंदवल्यानंतर बस पुढे मार्गस्थ झाली.

Intro:जळगाव
शाळकरी मुलींना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या एका बस कंडक्टरला संतप्त ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास रावेर तालुक्यातील पुनखेडा येथे घडली. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी २ तासांपर्यंत बस गावातच रोखून धरल्याने बसमधील प्रवाशांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागला.Body:रावेर आगाराच्या रावेर-अंतुर्ली बसमध्ये हा प्रकार घडला. शाळा सुटल्यानंतर पुनखेडा येथील काही विद्यार्थिनी या बसने घरी परत येत होत्या. बसमध्ये गर्दी असल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनी उभ्या होत्या. यावेळी काहीएक कारण नसताना बस कंडक्टरने विद्यार्थिनींना अश्लील शिवीगाळ केली. यापूर्वी देखील संबंधित कंडक्टरने असे प्रकार केलेले असल्याने विद्यार्थिनींनी भ्रमणध्वनीवरून बसमध्ये घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. ही बस पुनखेडा गावात आल्यानंतर बस थांब्यावर ग्रामस्थांनी कंडक्टरला चोप दिला. याच बसफेरीवर ड्युटी करणाऱ्या महिला वाहकाकडून देखील शाळकरी मुलींना शिवीगाळ होत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.Conclusion:गैरप्रकार करणाऱ्या कंडक्टरवर कारवाई झाली पाहिजे म्हणून ग्रामस्थांनी बस रोखून धरली. रावेर आगाराच्या आगारप्रमुखांनी गावात येऊन याबाबत निर्णय द्यावा, तोपर्यंत बस गावातून मार्गस्थ होऊ देणार, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने मोठा गोंधळ उडाला. या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. तब्बल २ तास हा प्रकार सुरू होता. शेवटी बस रावेर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. ग्रामस्थांनी तक्रार नोंदवल्यानंतर बस पुढे मार्गस्थ झाली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.