ETV Bharat / state

जळगाव जिल्हा बँक निवडणूक भाजप स्वबळावर लढणार, रक्षा खडसेंची लढत नणंद रोहिणी खडसेंशी होणार..?

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलचा फज्जा उडाल्याने काँग्रेस पाठोपाठ आता भाजपनेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी (दि. 17) सायंकाळी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजप नेत्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय एकमताने जाहीर केला. उद्या (18 ऑक्टोबर) भाजपकडून सर्व 21 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती भाजप नेते गिरीश महाजन यांनी बैठकीनंतर दिली. दरम्यान, भाजपच्या खासदार रक्षा खडसे देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नणंद अॅड. रोहिणी खडसेंसोबत होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच, जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

b
b
author img

By

Published : Oct 17, 2021, 8:40 PM IST

Updated : Oct 17, 2021, 10:18 PM IST

जळगाव - जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलचा फज्जा उडाल्याने काँग्रेस पाठोपाठ आता भाजपनेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी (दि. 17) सायंकाळी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजप नेत्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय एकमताने जाहीर केला. उद्या (18 ऑक्टोबर) भाजपकडून सर्व 21 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती भाजप नेते गिरीश महाजन यांनी बैठकीनंतर दिली. दरम्यान, भाजपच्या खासदार रक्षा खडसे देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नणंद अॅड. रोहिणी खडसेंसोबत होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच, जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

जळगाव जिल्हा बँक निवडणूक भाजप स्वबळावर लढणार

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी रविवारी सायंकाळी अजिंठा शासकीय विश्रामगृहात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकुमार महाजन आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आम्हाला गाफील ठेऊन इतरांची सुरू होती खलबते; गिरीश महाजनांचा थेट आरोप

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार आहे. भाजपकडून उद्या सर्वच्या सर्व 21 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. हा निर्णय आम्ही एकमताने घेतला आहे. कारण या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस उरलेला आहे. असे असताना आम्हाला गाफील ठेऊन इतर पक्षांची खलबते सुरू होती, असा घणाघाती आरोप करत गिरीश महाजन यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

शेवटच्या क्षणी त्यांनी असे करणे चुकीचेच

भाजप नेते गिरीश महाजन पुढे म्हणाले की, जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने सुरुवातीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सर्वपक्षीय पॅनल संदर्भात आग्रही भूमिका घेतली. सर्वपक्षीय पॅनलसाठी दोन ते तीन बैठका सकारात्मक झाल्या. जागा वाटपाचे सूत्र ठरले. त्यानंतर त्या त्या पक्षांनी आपल्या पक्षश्रेष्ठीकडून हिरवा कंदील मिळवला. मात्र, आता आम्हाला पक्षश्रेष्ठींकडून ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्याच्या सूचना असल्याचे सांगितले. शेवटच्या क्षणी असे करणे चुकीचे होते. असे करायचेच होते तर आम्हाला सुरुवातीलाच सांगायला हवे होते, असे सांगत गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.

काँग्रेसने सोयीचे राजकारण केले

गिरीश महाजन यांनी काँग्रेसवर थेट टीका केली. ते म्हणाले की, 'काँग्रेसने सर्वपक्षीय पॅनलसंदर्भात आयोजित केलेल्या सुरुवातीच्या 3 बैठकांना हजेरी लावली. पण नंतर मात्र, भाजप जातीयवादी पक्ष असल्याचे सांगून वेगळी त्यांनी भूमिका घेतली. हा प्रकार म्हणजे, काँग्रेसचे सोयीचे राजकारण होते', अशी टीकाही महाजन यांनी केली.

इतर पक्षातील लोक आमच्या संपर्कात; महाजनांचा गौप्यस्फोट

जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सर्वपक्षीय पॅनलबाबत सकारात्मक होतो. मात्र, तिन्ही पक्षांनी सोयीचे राजकारण केल्याचेही महाजन म्हणाले. इतर पक्षातील लोक आमच्या संपर्कात आहेत. ते उमेदवारी देण्याची मागणी करत आहेत. ते सक्षम असतील तर त्यांच्या उमेदवारीचा भाजप नक्की विचार करेल, असा गौप्यस्फोट देखील गिरीश महाजन यांनी यावेळी केला.

भाजपच्या नेतेमंडळीला उमेदवारी करण्याच्या वरिष्ठांच्या सूचना

जिल्हा बँक निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तसेच नेतेमंडळींनी या निवडणुकीसाठी उमेदवारी करण्याच्या सूचना भाजप नेत्यांना वरिष्ठांकडून प्राप्त झाल्या आहेत. गिरीश महाजन हे स्वतः उद्या उमेदवारी दाखल करणार आहेत. जामनेर तालुक्यातून सोसायटी मतदारसंघातून ते ही निवडणूक लढणार आहेत.

नणंद-भावजयीत रंगणार सामना..?

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार रक्षा खडसे यादेखील जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपकडून त्यांना उमेदवारी करण्याच्या सूचना असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रक्षा खडसे यांना भाजपकडून महिला राखीव मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची लढत नणंद अॅड. रोहिणी खडसेंसोबत होण्याची शक्यता आहे, असे झाले तर खडसे कुटुंबियांमध्येच सामना पाहायला मिळेल. ही लढत जिल्ह्यातील प्रमुख लक्षवेधी लढत असणार आहे.

पुढे काय होईल, हे आजच सांगणे अशक्य

जिल्हा बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची मुदत आहे. भाजप सर्व 21 जागांवर अर्ज दाखल करणार आहे. त्यानंतर माघारीसाठी 8 नोव्हेंबर पर्यंतची मुदत आहे. या काळात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहील. त्यामुळे पुढे कोणत्या पक्षासोबत युती होते का? हे आज सांगणे अशक्य असल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगत युतीबाबत उत्सुकता ताणून धरली आहे.

हेही वाचा - भाजप नेते गिरीश महाजनांना करायचंय चित्रपटात काम, निर्मात्याला म्हणाले, एक संधी द्या!

Last Updated : Oct 17, 2021, 10:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.