ETV Bharat / state

भाजप प्रदेशाध्यक्ष आज जळगावात; खडसेंची नाराजी होणार का दूर ?

उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासह परस्परात हाडवैर असलेले माजीमंत्री गिरीश महाजन आणि  एकनाथ खडसे हे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. खडसेंकडून स्वकियांवर जोरदार हल्लाबोल सुरू असताना आता ते आजच्या बैठकीत काय तोफगोळे डागतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

jal
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Dec 7, 2019, 10:41 AM IST

जळगाव - विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडून पराभूत जागांवरील कारणांचा शोध घेतला जात आहे. जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेरमध्ये भाजपच्या उमेदवारांचा पराभव हा पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांमुळे झाल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केल्याने पक्षश्रेष्ठींपुढे पेच निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीत चंद्रकांत पाटील हे नाराज असलेल्या खडसेंची मनधरणी करण्यात यशस्वी होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासह परस्परात हाडवैर असलेले माजीमंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. खडसेंकडून स्वकियांवर जोरदार हल्लाबोल सुरू असताना आता ते आजच्या बैठकीत काय तोफगोळे डागतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सिंचन योजनांमध्ये गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जळगावात पत्रकार परिषद घेऊन खुलासे केले. यावेळी भाजपतील ओबीसींना डावलण्याचा मुद्दा, पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव अशा मुद्यांवरही महाजन यांनी मौन सोडले. खडसेंच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे जाहीर करत त्यांनी, जर खडसेंना खरंच पाडापाडी करणाऱ्यांची नावे माहिती असतील तर ती त्यांनी जाहीर करावीत, असे आव्हान दिले होते. महाजन यांच्या आव्हानाला खडसे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काय तर प्रत्युत्तर देतात, हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे.

हेही वाचा - 'भाजपमध्ये कुणीही पाडापाडीचे उद्योग करत नाही, खडसेंचे मताधिक्य आधीच घटले होते'

भाजपत नाराज असलेले एकनाथ खडसे यांची मनधरणी होते का, हे आजच्या बैठकीनंतर ठरणार आहे. 2014 मध्ये राज्याच्या सत्तेत आल्यानंतर खडसेंना मुख्यमंत्रीपदाची मनषा होती. मात्र, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकले नव्हते. महसूलसह 12 खात्यांचे ते मंत्री होते. दीड वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर खडसेंवर भोसरीतील जमिनीच्या खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. त्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पत्नीशी झालेले कथित संभाषण, स्वीय सहाय्यकाचे लाचप्रकरण अशी एक ना अनेक प्रकरणे लागोपाठ समोर आल्याने खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या साऱ्या प्रकरणात झालेले आरोप सिद्ध न झाल्याने खडसेंना मंत्रिमंडळात परतण्याचा आशा होती. परंतु, त्यांना अखेरपर्यंत झुलवत ठेवण्यात आले. तेव्हापासून खडसे पक्षावर प्रचंड नाराज आहेत.

पुढे जाऊन खडसेंना सुनेच्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी खूप संघर्ष करावा लागला. नंतर तर स्वतःला विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने ते प्रचंड अस्वस्थ झाल्याचे पहायला मिळाले. कधीकाळी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत असलेले खडसे पुढे बाहेर राहिले. कन्येच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाने ते कमालीचे नाराज झाले आहेत. भाजपत बहुजन नेतृत्व संपवले जात असल्याचा आरोप करत खडसेंनी ओबीसी नेत्यांची एकत्र मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आजच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष खडसेंची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात, की खडसे वेगळी भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Intro:Please use file photo for this news

जळगाव
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडून पराभूत जागांवरील कारणांचा शोध घेतला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेरमध्ये भाजपच्या उमेदवारांचा पराभव हा पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांमुळे झाल्याचा आरोप माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी केल्याने पक्षश्रेष्ठींपुढे पेच निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीत चंद्रकांत पाटील हे नाराज असलेल्या खडसेंची मनधरणी करण्यात यशस्वी होतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.Body:उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासह परस्परात हाडवैर असलेले माजीमंत्री गिरीश महाजन, एकनाथ खडसे हे एकाच व्यासपीठावर असणार आहेत. खडसेंकडून स्वकियांवर जोरदार हल्लाबोल सुरू असताना आता ते आजच्या बैठकीत काय तोफगोळे डागतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सिंचन योजनांमध्ये गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर त्यावर खुलासा करण्यासाठी गिरीश महाजन यांनी शुक्रवारी जळगावात पत्रकार परिषद घेऊन खुलासे केले. यावेळी भाजपतील ओबीसींना डावलण्याचा मुद्दा, पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव अशा मुद्यांवरही महाजन यांनी मौन सोडले. खडसेंच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी जाहीर करत, जर खडसेंना खरंच पाडापाडी करणाऱ्यांची नावे माहिती असतील तर ती त्यांनी जाहीर करावीत, असे आव्हान दिले होते. महाजन यांच्या आव्हानाला खडसे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काय तर प्रत्युत्तर देतात, हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे.Conclusion:खडसेंची मनधरणी होणार का?

भाजपत नाराज असलेले एकनाथ खडसे यांची मनधरणी होते का, हे आजच्या बैठकीनंतर ठरणार आहे. 2014 मध्ये राज्याच्या सत्तेत आल्यानंतर खडसेंना मुख्यमंत्री पदाची मनीषा होती. मात्र, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकले नव्हते. महसूलसह 12 खात्यांचे ते मंत्री होते. दीड वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर खडसेंवर भोसरीतील जमिनीच्या खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. त्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या पत्नीशी झालेले कथित संभाषण, स्वीय सहाय्यकाचे लाचप्रकरण अशी एक ना अनेक प्रकरणे लागोपाठ समोर आल्याने खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या साऱ्या प्रकरणात झालेले आरोप सिद्ध न झाल्याने खडसेंना मंत्रिमंडळात परतण्याचा आशा होती. परंतु, त्यांना अखेरपर्यंत झुलवत ठेवण्यात आले. तेव्हापासून खडसे पक्षावर प्रचंड नाराज आहेत. पुढे जाऊन खडसेंना सुनेच्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी खूप संघर्ष करावा लागला. नंतर तर स्वतःला विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने ते प्रचंड अस्वस्थ झाले. कधीकाळी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत असलेले खडसे पुढे बाहेर राहिले. कन्येच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाने ते कमालीचे नाराज झाले आहेत. बभाजपत बहुजन नेतृत्व संपवले जात असल्याचा आरोप करत खडसेंनी ओबीसी नेत्यांची एकत्र मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आजच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष खडसेंची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात, की खडसे वेगळी भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.