ETV Bharat / state

गृहमंत्र्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर भाजपा खासदार रक्षा खडसेंची उघड नाराजी

author img

By

Published : Jan 28, 2021, 3:25 PM IST

Updated : Jan 28, 2021, 3:32 PM IST

त्यांनी 'ती' आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती, अशा शब्दांत भाजपा खासदार रक्षा खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली.

Raksha
Raksha

जळगाव - अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनी संकेतस्थळावरील आक्षेपार्ह उल्लेखाची दखल घेतली, ही चांगली बाब आहे. परंतु, दुसरीकडे मला वाईट या गोष्टीचे वाटले, की त्यांनी 'ती' आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती, अशा शब्दांत भाजपा खासदार रक्षा खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली.

देशमुख यांच्या भूमिकेचे स्वागत

भाजपाच्या अधिकृत संकेतस्थळावर खासदार रक्षा खडसेंच्या बाबतीत आक्षेपार्ह उल्लेख केल्याच्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. याप्रश्नी आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आज दुपारी जळगावात असताना खासदार रक्षा खडसेंनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भूमिकेचे स्वागत केले, पण गृहमंत्र्यांनी सोशल मीडियावर ती आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याने उघड नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

काय म्हणाल्या रक्षा खडसे?

अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा मिळालीच पाहिजे. पण गृहमंत्र्यांनी आक्षेपार्ह शब्द असलेली पोस्ट त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकायला नको होती, असे त्या म्हणाल्या.

'ही गोष्ट फार मोठी करण्यासारखी नाही'

खासदार रक्षा खडसे पुढे म्हणाल्या, की राजकारणात असताना आपल्यासोबत चांगल्या गोष्टी पण घडत असतात आणि काही यंत्रणांच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी पण घडत असतात. ही गोष्ट घडून गेली आहे. ती फार मोठी करण्यासारखी नाही. या प्रकरणाची आता चौकशी होत आहे. जो कुणी व्यक्ती यात दोषी असेल, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मला वाटते. हा विषय फक्त माझ्यापुरता नाहीये, तर देशात राहणाऱ्या प्रत्येक महिलेच्या बाबतीत तिला बदनाम करण्याचे कृत्य व्हायला नको, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Last Updated : Jan 28, 2021, 3:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.