ETV Bharat / state

महाजनादेश यात्रेत जळगावातील बडे नेते भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता

भाजपकडून सुरू असलेल्या मेगा भरतीचे बहुसंख्य प्रवेश हे याच यात्रेत होत आहेत. ७ ऑगस्टला ही यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल होत असून जिल्ह्यातील कोणते नेते भाजपवासी होतील, याची उत्सुकता निर्माण झाली आहे

author img

By

Published : Aug 5, 2019, 8:31 PM IST

महाजनादेश यात्रेत जळगावातील बडे नेते भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता

जळगाव - मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ७ ऑगस्टला जळगाव जिल्ह्यात दाखल होत आहे. यावेळी जिल्ह्यातील अनेक बडे नेते भाजप प्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा आहे. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपात जाण्यास उत्सुक असल्याचा जाणकारांचा दावा आहे.

मेगा भरतीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे काम

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली २०१४ मध्ये केंद्रापाठोपाठ राज्यातही भाजपचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था देखील काबीज केल्या. मोदी लाटेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य प्रादेशिक पक्षांची वाताहत झाली. २०१९ मध्ये देखील ही लाट कायम राहिल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीकडे भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. पूर्ण बहुमताने विधानसभा ताब्यात घेण्यासाठी भाजप कामाला लागला आहे. याच अनुषंगाने मेगा भरतीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे.

जळगावमध्ये ७ ऑगस्टला महाजनादेश यात्रा

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ७ ऑगस्टला जळगाव जिल्ह्यात दाखल होत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, माजीमंत्री गुलाबराव देवकर, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, विधानपरिषदेचे माजी आमदार मनीष जैन, काँग्रेसचे रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी, अंमळनेरचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी आदींचे भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेला दुजोरा मिळू शकलेला नसला तरी सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता ते शक्य असल्याचा जाणकारांचा दावा आहे.

भाजप मारणार 'एका दगडात दोन पक्षी'?

एकीकडे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपवर दबाव आणत आहे तर दुसरीकडे भाजप महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून स्वबळाची चाचपणी करत आहे. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी याठिकाणी सेनेचीही ताकद चांगली आहे. युती झाली नाही तर भाजपला सेनेचेच प्रमुख आव्हान असेल, हे भाजप जाणून आहे. युती फिस्कटली तर भविष्यातील राजकीय डावपेच काय असतील, हे लक्षात घेऊनच भाजप चाल करणार आहे. महाजनादेश यात्रेवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांना भाजपात घेऊन त्यांचा सेनेविरोधात प्रमुख आयुध म्हणून वापर करण्याची खेळी भाजप खेळू शकते.

Intro:Please use file photo for this news

जळगाव
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. भाजपकडून सुरू असलेल्या मेगा भरतीचे बहुसंख्य प्रवेश याच यात्रेत होत आहेत. ७ ऑगस्टला ही यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल होत असून जिल्ह्यातील कोणते नेते भाजपवासी होतील, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे.Body:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली २०१४ मध्ये केंद्रापाठोपाठ राज्यातही भाजपचे सरकार बहुमताने सत्तेत आले. त्यानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था देखील काबीज केल्या. मोदी लाटेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य प्रादेशिक पक्षांची वाताहत झाली. २०१९ मध्ये देखील ही लाट कायम राहिल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीकडे भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. पूर्ण बहुमताने विधानसभा ताब्यात घेण्यासाठी भाजप कामाला लागला आहे. याच अनुषंगाने मेगा भरतीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे. प्रमुख विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्यात भाजप प्रथमदर्शनी यशस्वी देखील झाल्याचे दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रापासून सुरू झालेल्या मेगा भरतीचा क्रम पुढे विदर्भ, मराठवाडा असा राहिला. आता उत्तर महाराष्ट्रातील खान्देशाचा क्रमांक असल्याचे बोलले जात आहे. ७ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल होत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री गुलाबराव देवकर, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, विधानपरिषदेचे माजी आमदार मनीष जैन, काँग्रेसचे रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी, अमळनेरचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी आदींचे भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेला दुजोरा मिळू शकलेला नसला तरी सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता ते शक्य असल्याचा जाणकारांचा दावा आहे.

भाजप मारणार 'एका दगडात दोन पक्षी'?

भाजपचा विजयी वारू चौफेर उधळत आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपला मिळणारा जनमताचा कौल लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढता येईल का, याची चाचपणी भाजपकडून सुरू आहे. महाजनादेश यात्रा हा त्याचाच परिपाक असल्याचेही बोलले जात आहे. आजच्या घडीला भाजप-सेनेत युतीच्या अनुषंगाने एकमत झाले आहे, असे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. एकीकडे शिवसेना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपवर दबाव आणत आहे तर दुसरीकडे भाजप महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून स्वबळाची चाचपणी करत आहे. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी याठिकाणी सेनेचीही ताकद चांगली आहे. युती झाली नाही तर भाजपला सेनेचेच प्रमुख आव्हान असेल, हे भाजप जाणून आहे. युती फिस्कटली तर भविष्यातील राजकीय डावपेच काय असतील, हे लक्षात घेऊनच भाजप चाल करणार आहे. महाजनादेश यात्रेवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांना भाजपत घेऊन त्यांचा सेनेविरोधात प्रमुख आयुध म्हणून वापर करण्याची खेळी भाजप खेळू शकते.Conclusion:ही आहेत राजकीय गृहितके-

भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये गुलाबराव देवकर, दिलीप वाघ, मनीष जैन, शिरीष चौधरी यांची नावे आघाडीवर आहेत. युती झाली नाही तर ही इच्छुक मंडळी त्या-त्या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांसमोर प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून असेल, या नजरेतून पाहिले जात आहे. विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जागा सेनेच्या वाट्याला आहे. येथे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात भाजप गुलाबराव देवकरांना उतरवू शकते. समजा युती झालीच तर देवकरांना चाळीसगाव मतदारसंघातून भाजप रिंगणात आणू शकते. त्यामुळे देवकरांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्याचप्रमाणे पाचोरा-भडगाव मतदारसंघात किशोर पाटील हे सेनेचे विद्यमान आमदार आहेत. ते आताही प्रमुख उमेदवार असतील. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांना उमेदवारी दिली तर तगडी लढत होईल, याच अनुषंगाने भाजप त्यांना प्रवेश देईल, अशी शक्यता आहे. विधानपरिषदेचे माजी आमदार मनीष जैन हे सध्या राजकीय विजनवासात आहेत. मात्र, त्यांचे वडील माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत ट्युनिंग चांगले आहे. मुलाच्या राजकीय पूनर्वसनासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे मनीष जैनांना भाजप प्रवेश मिळून त्यांच्यासाठी चोपडा किंवा माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून पुढे केले जाऊ शकते. खडसेंना शह देण्यासह चोपड्यातील सेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांना आव्हान उभे करण्याची खेळी भाजप खेळू शकते. युती झाली नाही तर मुक्ताईनगरातून सेनेकडून जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे उमेदवार असण्याची शक्यता आहे. सेनेविरोधात मनीष जैन यांना रिंगणात उतरवून सेनेला आव्हान उभे करणे आणि खडसेंना बाजूला सारणे, असे एक घाव दोन तुकडे भाजप करू शकते. तिकडे रावेरात भाजपने पहिली चाल केली आहे. विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांना महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून त्यांची कॅबिनेट मंत्र्याची मनीषा पूर्ण केली आहे. आता रावेरात काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना पक्षात घेऊन भाजप संख्याबळ वाढीची खेळी करू शकतो. कारण हरिभाऊ जावळे यांच्याविषयी जनतेत प्रचंड नाराजी आहे. जावळेंच्या तुलनेत चौधरी उजवे असल्याने भाजप त्यांना पायघड्या टाकू शकतो. हीच शक्यता अमळनेरात आहे. विद्यमान आमदार शिरीष चौधरी हे भाजपचे सहयोगी आमदार आहेत. त्यांना भाजपवासी करून अधिकृतरित्या रिंगणात उतरवले जाऊ शकते. युतीच्या फॉर्म्युल्यात अमळनेरची जागा सेनेच्या वाट्याला असली तरी इथे सेनेकडे तुल्यबळ उमेदवार नाही. संख्याबळ वाढीसाठी भाजप चौधरींना आमदारकीच्या आखाड्यात उतरवू शकते, असा अंदाज आहे. दरम्यान, भाजपच्या महाजनादेश यात्रेत जळगाव जिल्ह्यातील कोणत्या नेत्यांचा भाजप प्रवेश होतो, यावर युती होणार किंवा नाही, याचे स्पष्ट संकेत मिळणार आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.