जळगाव - राज्यभर सध्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. सर्वच पक्षाच्या स्टार प्रचारक नेत्यांची शाब्दिक तोफ धडाडताना दिसत आहे. केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यासुद्धा युतीच्या प्रचारासाठी राज्यात आल्या आहेत. आपल्या देशाला जाती-धर्माच्या नावाखाली तोडण्याचे पाप करणाऱ्या मानसिकतेविरुद्ध भाजपच्या नेत्यांनी संघर्ष केला असल्याचे प्रतिपादन असे प्रतिपादन इराणी यांनी केले. त्या जळगाव येथे बोलत होत्या.
हेही वाचा - नाशकात युतीत बिघाडी, 36 सेना नगरसेवकांचे राजीनामे
भाजप नेत्या तथा केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केले. विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे प्रचारसभा आयोजित केली होती. सभेला माजीमंत्री एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे, रावेरचे उमेदवार हरिभाऊ जावळे, मुक्ताईनगरच्या उमेदवार अॅ. रोहिणी खडसे, बेटी बचाओ अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके आदी उपस्थित होते. या सभेला मार्गदर्शन करताना स्मृती इराणी यांनी भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात केलेली कामगिरी, कलम ३७०, भारत स्वच्छ अभियान अशा मुद्यांवर मत मांडत काँग्रेसवर टीका केली.
स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, एका छोट्याशा कुटुंबात जन्मलेली व्यक्ती त्याच्या मेहनतीच्या बळावर देशाचे सर्वोच्च पद असलेल्या पंतप्रधान पदापर्यंत पोहचू शकते, ही बाब नरेंद्र मोदींच्या रुपाने अधोरेखित झाली आहे. अशा पक्ष संघटनाचा आपण एक भाग आहोत, याचा माझ्यासारख्या महिला कार्यकर्त्यांना अभिमान वाटतो. एकीकडे देशाला तोडण्याचा विचार करणारे लोक आहेत तर दुसरीकडे आम्ही या देशाला आपली कर्मभूमी, जननी जन्मभूमी मानतो. या जन्मभूमीवर जेव्हा संकटे आली तेव्हा आम्ही प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, काँग्रेसच्या काळात मुंबईवरील २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला होऊनही कारवाईचा विचार होत नव्हता. पण आज मोदींच्या कार्यकाळात पाकिस्तानने फक्त वाईट नजरेने पाहिले तर पाकिस्तानात थेट बॉम्ब पडला, असे सांगत इराणी यांनी विरोधकांचा नामोल्लेख न करता थेट टीका केली.
शरद पवारांना राष्ट्रीय नेते म्हणावं तरी कसे - एकनाथ खडसे
मला संपविण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत. आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मुक्ताईनगर मतदारसंघात माझ्या कन्येला पराभूत करण्यासाठी विरोधक प्रयत्नशील आहेत. याठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर सोडा, सेनेचा बंडखोर रिंगणात आहे. एवढंच नाही तर मला संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जळगावात येऊन गेले. पवार राष्ट्रीय नेते असताना त्यांनी अशी भूमिका घ्यावी? असे असेल तर त्यांना राष्ट्रीय नेते म्हणावं तरी कसे? पण एक गोष्ट आहे, पवारांमुळे माझी प्रतिष्ठा वाढली, असेही खडसे यावेळी म्हणाले.
हेही वाचा - ईव्हीएममध्ये नव्हे तुझ्या बोटातच घोळ आहे - अजित पवार