ETV Bharat / state

गिरीश महाजनांना कोरोनाची लागण; जामनेरातील घरी झाले क्वारंटाईन

गिरीश महाजन यांच्या पत्नी तथा जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांनादेखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. नंतर त्यांच्या कन्येलाही कोरोना झाला होता.

author img

By

Published : Mar 17, 2021, 12:17 PM IST

Updated : Mar 17, 2021, 7:24 PM IST

GIRISH MAHAJAN
गिरीश महाजन

जळगाव - भाजप नेते तथा माजीमंत्री गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपासून त्यांना ताप जाणवत होता. त्यानंतर त्यांनी खबरदारी म्हणून कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रकृती स्थिर असल्याने ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या जामनेरातील राहत्या घरीच क्वारंटाईन झाले आहेत.

याआधी पत्नी आणि कन्येलाही झाला होता कोरोना-

गिरीश महाजन यांच्या पत्नी तथा जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांनादेखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. नंतर त्यांच्या कन्येलाही कोरोना झाला होता. आता गिरीश महाजन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 8 दिवसात संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन गिरीश महाजन यांनी केले आहे.

हेही वाचा - दगडूशेठ गणपतीला दान केलेले दीड किलो सोन्याचे दागिने सीआयडी कडून जप्त

भाजपची डोकेदुखी वाढली -

सध्या जळगावात महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यात भाजपच्या 57पैकी 25पेक्षा अधिक नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेला समर्थन दिल्याचे सांगितले जात आहे. हे नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने भाजप संकटात सापडला आहे. अशातच संकटमोचक समजले जाणारे माजीमंत्री गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाल्याने भाजपच्या अडचणीत भर पडली आहे. महाजन सध्या जामनेरातून मोबाईलवर संपर्कात आहेत. तेथूनच ते या निवडणुकीच्या अनुषंगाने सूत्रे हलवत आहेत.

हेही वाचा - सचिन वाझे प्रकरणाचा सरकारवर परिणाम नाही, महाआघाडीत सर्वकाही सुरळीत - पवार

Last Updated : Mar 17, 2021, 7:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.