ETV Bharat / state

उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी चेहरा म्हणून रक्षा खडसेंचे लॉंचिंग?; भाजपच्या राजकीय खेळीची चर्चा - भाजपा खासदार रक्षा खडसे

भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपत एकनाथ खडसे यांच्याकडे ओबीसी चेहरा म्हणून पाहिले जात होते. परंतु, पक्षात घुसमट होत असल्याने खडसेंनी अखेर भाजपचा त्याग केला. पक्ष सोडताना खडसेंनी भाजपमध्ये ठराविक लोकांकडून ओबीसी नेत्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला होता. ही पार्श्वभूमी असताना आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विषयावरून राज्यात सत्ताधारी विरूद्ध विरोधक, असा सामना रंगला आहे.

ओबीसी चेहरा म्हणून रक्षा खडसेंचे लॉंचिंग?;

author img

By

Published : Jun 27, 2021, 2:20 PM IST

जळगाव - पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून भाजपचा त्याग करत राष्ट्रवादीवासी झालेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा, खासदार रक्षा खडसेंना भाजपकडून उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी चेहरा म्हणून लाँच केले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारला लक्ष्य करत भाजपने राज्यव्यापी आंदोलन केले. उत्तर महाराष्ट्रात या आंदोलनाच्या पूर्वतयारीसह आंदोलन यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी माजीमंत्री गिरीश महाजन यांच्याऐवजी रक्षा खडसेंवर होती. त्यांनी ती निभावली देखील. त्यामुळे ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्या लॉंचिंगच्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. या माध्यमातून ओबीसींच्या मुद्द्यावरून पक्षावर होणारा आरोप पुसण्याची खेळी भाजप करत असल्याचे बोलले जात आहे.

ओबीसी चेहरा म्हणून रक्षा खडसेंचे लॉंचिंग?;

2019 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांची तिकिटे कापली. तेव्हापासून खडसेंनी ओबीसींचा मुद्दा ऐरणीवर आणून भाजपला सातत्याने लक्ष्य केले. भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपत एकनाथ खडसे यांच्याकडे ओबीसी चेहरा म्हणून पाहिले जात होते. परंतु, पक्षात घुसमट होत असल्याने खडसेंनी अखेर भाजपचा त्याग केला. पक्ष सोडताना खडसेंनी भाजपमध्ये ठराविक लोकांकडून ओबीसी नेत्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला होता. ही पार्श्वभूमी असताना आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विषयावरून राज्यात सत्ताधारी विरूद्ध विरोधक, असा सामना रंगला आहे. ही आयती संधी हेरून भाजपने अचूक टायमिंग साधले आहे. ओबीसी चेहरा म्हणून एकनाथ खडसे यांच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातून कोण? या प्रश्नाचे उत्तर शोधताना भाजपने खडसेंच्या स्नुषा खासदार रक्षा खडसेंना ओबीसी चेहरा म्हणून पुढे केल्याचे पाहायला मिळत आहे.

ओबीसी आंदोलनाच्या तयारीपासूनच पुढे होत्या खडसे-

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण नाकारले. त्यानंतर भाजपने हे आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारच्या विरोधात मोहीम उघडली. यातच राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. या आंदोलनाच्या पूर्वतयारीपासून ते आंदोलन करण्यापर्यंतच्या नियोजनात रक्षा खडसे प्रदेश कार्यकारिणीच्या बड्या नेत्यांसोबत उपस्थित होत्या. आंदोलन करण्यापूर्वी रक्षा खडसेंनी नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यात नियोजनाची रूपरेषा आखली. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात आंदोलन त्यांच्या नेतृत्त्वात झाले. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अनुपस्थितीत रक्षा खडसेंनी कमान सांभाळली. राज्यव्यापी आंदोलन असताना गिरीश महाजन मुंबईत होते. तर दुसरीकडे रक्षा खडसेंना या राज्यव्यापी आंदोलनाची सूत्रे देण्यात आली, असे पहिल्यांदा घडले. त्यामुळे भाजप रक्षा खडसेंना ओबीसी चेहरा म्हणून लॉंच तर करत नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ही असू शकतात रक्षा खडसेंना पुढे आणण्याची कारणे-

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकताना भाजपत ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. हा आरोप खोडून काढण्यासाठी खडसेंच्या कुटुंबातील व्यक्तीला ओबीसी चेहरा म्हणून पुढे आणण्याची ही भाजपची खेळी असू शकते. दुसरीकडे खडसेंच्या सोडचिठ्ठीनंतर जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा सेटबॅक बसला. त्यातून सावरण्याचाही भाजपचा उद्देश असू शकतो. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने खडसे, मुंडे, तावडे आणि बावनकुळे या नेत्यांची तिकिटे कापली होती. तेव्हा भाजपत ओबीसी नेतृत्त्वाचा मुद्दा पुढे आला होता. त्यानंतर काही काळानंतर भाजपने पंकजा मुंडेंना प्रदेश कार्यकारिणीवर उपाध्यक्ष पदावर संधी दिली. तरीही पक्षात ओबीसींच्या मुद्द्यावरून खल सुरूच आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात नारायण राणेंसह प्रीतम मुंडेंना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत मुंडे परिवाराच्या संधीचा प्रश्न सुटेल. तर खडसे परिवाराच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर रक्षा खडसेंना उत्तर महाराष्ट्रात ओबीसी चेहरा म्हणून पुढे आणले जाऊ शकते. एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांच्याच परिवारातील रक्षा खडसेंचे नेतृत्व सहज स्वीकारले जाऊ शकते, असा विचार भाजपने केला असावा. म्हणूनच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या लढाईत रक्षा खडसेंकडे धुरा सोपवण्यात आली आहे.

गिरीश महाजन यांना पर्याय?

उत्तर महाराष्ट्रातून ओबीसी चेहरा म्हणून खासदार रक्षा खडसेंचे लॉंचिंग करताना भाजपकडून गिरीश महाजन यांना पर्याय तर दिला जात नाही ना? अशीही चर्चा आहे. कारण अलीकडेच गिरीश महाजन यांच्याकडून नाशिकची सूत्रे काढून ती माजी कॅबिनेटमंत्री आमदार जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आली आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तशी घोषणा केली आहे. त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनाची सूत्रे रक्षा खडसेंकडे देण्यात आली होती. 'भाजपात अनेक ओबीसी चेहरे आहेत. अशा परिस्थितीत पक्ष जी जबाबदारी देईल, ती पार पाडण्याचा आपला प्रयत्न असणार आहे', अशी प्रतिक्रिया रक्षा खडसेंनी ओबीसी आंदोलनावेळी देत ओबीसी नेतृत्त्वाची जबाबदारी स्वीकारण्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिले होते. या साऱ्या घडामोडी गिरीश महाजन यांच्या चिंता वाढवणाऱ्या आहेत. येणाऱ्या काळात नेमकं काय घडते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.