ETV Bharat / state

भाजपकडून खडसेंना डच्चू... खडसेंना उमेदवारी - Eknath khadse assembly elections 2019

भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आदींची नावे त्या यादीत आलीत. मात्र, पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव पहिल्या यादीत न आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पहिल्या यादीची अपेक्षा मावळल्यावर दुसरी यादीत 14, तिसऱ्या यादीत 4 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, यामध्ये देखील खडसेंचे नाव न आल्याने जळगाव जिल्ह्यासह राज्यांतील अनेकांना धक्का बसला आहे.

भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे
author img

By

Published : Oct 4, 2019, 1:04 PM IST

मुंबई - नुकतीच भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. मात्र, या चौथ्या यादीतही पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव आले नाही. तर त्यांच्या ऐवजी खडसेंच्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघातून खडसेंच्या कन्या रोहिणी-खडसे खेवलकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एकीकडे राज्यातील पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारून त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे खडसेंच्या एका डोळ्यात 'हसू' आणि एका डोळ्यात 'अश्रू' अशी काहीशी परिस्थिती खडसेंची निर्माण झाली आहे. एकप्रकारे 'खडसेंना डच्चू...खडसें'नाच उमेदवारी अशी स्थिती मतदारसंघात झाली आहे.

खडसेंचा पत्ता कट होणार हे जवळपास निश्चित होते. मात्र तावडे, मेहता आणि पुरोहीत यांना उमेदवारी नाकरल्याची उलटसुलट चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी तिकीट वाटपात आपली मुत्सद्दीगिरी दाखवून देत सर्वांनाच सुचक इशारा दिला आहे.याचा अर्थ असा की खडसेंना डच्चू...तर खडसेंना उमेदवारी असे दिसून येत आहे.

हेही वाचा - ..या कारणांमुळेच खडसे, तावडे, मेहता, पुरोहीत यांचा पत्ता झाला कट ?

भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आदींची नावे त्या यादीत आलीत. मात्र, पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव पहिल्या यादीत न आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पहिल्या यादीची अपेक्षा मावळल्यावर दुसरी यादीत 14, तिसऱ्या यादीत 4 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, यामध्ये देखील खडसेंचे नाव न आल्याने जळगाव जिल्ह्यासह राज्यांतील अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी तर आता खडसे पक्षांतर करणार की काय असा अंदाजही लावायला सुरूवात केली. तिकडे मुंबईत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर रित्या सांगितले की, खडसे गेल्या 3 महिन्यांपासून संपर्कात आहेत. एवढेच नव्हे तर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे खडसेंच्या भेटीला जळगावकडे रवाना झाले आहेत, यांसारख्या ब्रेकिंग सुद्धा माध्यमांवर दाखवल्या जाऊ लागल्या. मात्र, सगळीकडे या वावड्य़ा उठल्यानंतर देखील खडसेंनी शेवटपर्यंत म्हणजे गुरूवारी देखील पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी काहीही झाले तरी पक्षाचा निर्णय मला मान्य राहील आणि शेवटपर्यंत मी भारतीय जनता पक्षातच राहील.

यानंतर आज (शुक्रवारी) भारतीय जनता पक्षाची यादी जाहीर झाली आणि या यादीत खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना पक्षाने खडसेंच्या जागी उमेदवारी दिली. आता सर्वात महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे खडसेंना डावलून त्यांच्या मुलीला उमेदवारी देऊन पक्षाने त्यांची बोळवण तर केली नाही ना ? तसेच गेल्या 5 वर्षात असे अचानक काय झाले की, मुख्यमंत्री पदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक, 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणूकींमध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती, आणि त्यानंतर तब्बल 11 पेक्षा जास्त मंत्रालये साभाळणाऱ्या व्यक्तीला 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये साधी उमेदवारी देखील मिळू नये ? तर हे काही आकस्मित घडले असे वाटत नाही.

हेही वाचा - पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचे खडसेंचे आवाहन

25 वर्षांपासून भाजप-सेनेची असलेली युती 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीआधी जागावाटपाच्या मतभेदामुळे तुटली. आणि भाजप-शिवसेना युती तोडण्याची घोषणा खडसेंनीच जाहीर केली होती. यानंतर ते मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, निवडणूक झाल्यानंतर भाजप-सेनेची पुन्हा युती झाली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पक्षाच्या हाय कमांडने खडसेंऐवजी देवेंद्र फडणवीस यांना विराजमान केले. अर्थात यानंतर त्यांच्याकडे तब्बल 11 मंत्रालयांपेक्षा जास्त खात्यांचा पदभार दिला गेला. आणि ते नं.1 ऐवजी राज्यातील नं.2 चे नेते झाले. मात्र, इतक्या खात्यांचा पदभार स्वीकारल्यानंतरही त्यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची खदखद कायम राहिली. त्यांनी प्रत्येक कार्यक्रमात जिथे त्यांना वेळ संधी मिळेल त्या ठिकाणी त्यांनी आपल्या मनातील खदखद कायम बोलून दाखविली.

भोसरी येथील ‘एमआयडीसी’च्या कथित भूखंड घोटाळाप्रकरणात नाव आल्यानंतर त्यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला. आणि यानंतर त्यांना अधिकच धक्का बसला. तर दुसरी कडे जिल्ह्यातीलच पक्षाचे नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांच्या अधिक जवळचे स्थान मिळू लागले. गेल्या 5 वर्षात त्यांनी राज्यातील पक्षाचे संकटमोचक नेते अशी आपली प्रतिमा निर्माण केली. आणि खडसेऐंवजी महाजन जिल्ह्यातील पक्षाचे जेष्ठ नेते झाले. महाजन यांनीदेखील आपणच खडसेंपेक्षा प्रमुख नेते आहोत, ही भूमिका निभावण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - 'षडयंत्र रचणाऱ्याला खडसेंनी समोर आणावेच'

एकनाथ खडसे यांचे कधीही मुख्यमंत्र्यांबरोबर पटले नाही. मुख्यमंत्री पदापासून डावलल्यानंतरही त्यांनी माझेच सरकार आहे, असेच नेहमी सांगितले. त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही जाहीरपणे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अनेकदा लक्ष केले. या सर्व बाबींवर मुख्यमंत्र्यांची बारीक नजर होती. शेवटी एक वर्षाने खडसेंचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आले. त्यांना मंत्रीपद सोडावे लागले. मंत्रीपद गेल्यानंतरही खडसे यांनी सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. पुढच्या काळातही खडसे त्रासदायक ठरू शकतात, ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली असणार म्हणूनच त्यांची उमेदवारी कापली गेली असे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

सलग 3 यादींनंतर आता तिसऱ्या यादीमध्ये मुक्ताईनगर मतदार संघात भाजपने उमेदवारी तर दिली. मात्र, ती माजी मंत्री खडसेंना नव्हे, तर त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना. आता सर्वात महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे खडसेंना डावलून त्यांच्या मुलीला उमेदवारी देऊन पक्षाने त्यांची बोळवण तर केली नाही ना ? आणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांप्रमाणेच एकनाथ खडसे यांचा हा राजकारणातील अस्त तर नाही ना ? असा प्रश्न राजकीय विश्लेषक उपस्थित करत आहेत.

हेही वाचा - एकनाथ खडसेंनी एबी फॉर्म नसतानाही भरला उमेदवारी अर्ज? 'हे' आहे कारण

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.