ETV Bharat / state

रेल्वे अर्थसंकल्पात भुसावळ ते खरगपूर 'कॉरिडॉर'ची घोषणा; शिक्षणासह व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने ठरेल महत्त्वपूर्ण पाऊल - jalgaon railway news

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात रेल्वेच्या भुसावळ ते खरगपूर कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे.

Bhusawal to Kharagpur 'Corridor' announced in Railway Budget
रेल्वे अर्थसंकल्पात भुसावळ ते खरगपूर 'कॉरिडॉर'ची घोषणा; शिक्षणासह व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने ठरेल महत्त्वपूर्ण पाऊल
author img

By

Published : Feb 1, 2021, 3:45 PM IST

Updated : Feb 1, 2021, 6:17 PM IST

जळगाव - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. याच अर्थसंकल्पात रेल्वेचाही अर्थसंकल्प एकत्रितपणे सादर झाला. रेल्वेच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र आणि जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण घोषणा झाली. ती म्हणजे, भुसावळ ते पश्चिम बंगालधील खरगपूर दरम्यानच्या कॉरिडॉरची. यासह जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते जामनेर या मीटर गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रूपांतर करून तो पुढे बोदवडपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक मेट्रोसाठीही भरीव निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प चांगला राहिला आहे. 'भुसावळ ते खरगपूर कॉरिडॉर' हा जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने शिक्षणासह व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

रेल्वे अर्थसंकल्पात भुसावळ ते खरगपूर 'कॉरिडॉर'ची घोषणा; शिक्षणासह व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने ठरेल महत्त्वपूर्ण पाऊल

पश्चिम बंगालमधील खरगपूर हे शहर औद्योगिकदृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. त्यातच आयआयटीमुळे या शहराला विशेष असे महत्त्व आहे. त्यामुळे भुसावळ ते खरगपूर कॉरिडॉर अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा असणार आहे. याच विषयाबाबत रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य गनी मेमन यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, रेल्वेच्या अर्थसंकल्पात झालेली भुसावळ ते खरगपूर कॉरिडॉरची घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षण, व्यापार तसेच उद्योगाच्या अनुषंगाने ही एक मोठी उपलब्धी आहे, असेच म्हणता येईल. या कॉरिडॉरसाठी नेमकी किती कोटी रुपयांची तरतूद झाली आहे किंवा हा कॉरिडॉर कसा असेल? याची माहिती आता मिळालेली नाही. पूर्वी रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्ररित्या मांडला जात होता. त्यावेळी अर्थसंकल्प सादर होताना ज्या गोष्टींची अर्थसंकल्पात तरतूद असायची त्याची विस्तृत माहिती रेल्वे प्रशासनाला मिळणाऱ्या 'पिंक बुक'मध्ये असायची. आता रेल्वेचा अर्थसंकल्प हा केंद्रीय अर्थसंकल्पासोबतच मांडला जात असल्याने ही पिंक बुक काही दिवसांनी प्राप्त होईल. त्यामुळे भुसावळ ते खरगपूर हा कॉरिडॉर कसा असेल, याची माहिती मिळेल. मात्र, महत्त्वाची बाब म्हणजे, या कॉरिडॉरची घोषणा होणे, ही मोठी बाब आहे, असे म्हणता येईल, असे गनी मेमन यांनी सांगितले.

जळगाव जिल्हा थेट पश्चिम बंगालशी जोडला जाणार-

गनी मेमन पुढे म्हणाले, रेल्वे अर्थसंकल्पात भुसावळ ते खरगपूर कॉरिडॉरची घोषणा झाली आहे. यात रेल्वे प्रशासनाकडून भुसावळवरून खरगपूरला जाण्यासाठी विशेष एक्सप्रेस गाडीची घोषणा होऊ शकते. त्याचप्रमाणे, व्यापार आणि उद्योगाच्या अनुषंगाने, मालवाहतूक गाड्याही या कॉरिडॉरच्या माध्यमातून चालवल्या जाऊ शकतात. हा कॉरिडॉर जळगाव जिल्ह्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जळगाव जिल्हा थेट पश्चिम बंगालची जोडला जाईल. त्यामुळे खरगपूर आयआयटी त्याचप्रमाणे तेथील उद्योग-व्यवसायाशी आपल्या जिल्ह्यातील व्यापारी जोडले जातील, असेही गनी मेमन यांनी सांगितले.

रेल्वेसाठी महत्त्वपूर्ण घोषणा-

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. महाराष्ट्रातील नाशिक मेट्रोसाठी देखील निधीची घोषणा करण्यात आलेली आहे. नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे, डिसेंबर 2023 पर्यंत रेल्वेचे ब्रॉडगेज पूर्ण करण्यात येणार आहे. यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते जामनेर दरम्यान असलेल्या मीटर गेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यात येणार असून, हा रेल्वे मार्ग जामनेरपासून पुढे बोदवडपर्यंत वाढविण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा ते बोदवड दरम्यान ब्रॉडगेज पूर्ण करण्याची मागणी होती; ती आता पूर्ण होईल, अशी आशा आहे.

Last Updated : Feb 1, 2021, 6:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.