ETV Bharat / state

'देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाण्यासाठी माझ्या शुभेच्छा' - एकनाथ खडसे जळगाव लेटेस्ट बातमी

देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत. ते खरंच केंद्रात जाणार असतील तर मी या गोष्टीचे स्वागत करेल. ते अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा केंद्राला तर फायदा होईलच शिवाय राज्यालाही केंद्राच्या अनेक योजना पदरी पाडून घेण्यास मदत होईल. आपला एखादा जवळचा नेता केंद्रात जात असेल तर त्याचा आपल्यालाच फायदा होतो, असे खडसे यावेळी म्हणाले.

former minister eknath khadse
माजी मंत्री एकनाथ खडसे
author img

By

Published : Feb 7, 2020, 12:03 PM IST

Updated : Feb 7, 2020, 12:10 PM IST

जळगाव - राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत. ते केंद्रात जाणार असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. या गोष्टीचे मी स्वागत करेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. एकनाथ खडसे आज (शुक्रवारी) सकाळी जळगावात त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खडसेंनी फोन टॅपिंग, फडणवीस यांची केंद्रात जाण्याची चर्चा, मुंबईतील महानंदच्या कारभारसंदर्भात मत मांडले.

एकनाथ खडसे (ज्येष्ठ नेते, भाजप)

खडसे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत. ते खरंच केंद्रात जाणार असतील तर मी या गोष्टीचे स्वागत करेल. ते अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा केंद्राला तर फायदा होईलच शिवाय राज्यालाही केंद्राच्या अनेक योजना पदरी पाडून घेण्यास मदत होईल. आपला एखादा जवळचा नेता केंद्रात जात असेल तर त्याचा आपल्यालाच फायदा होतो, असे खडसे यावेळी म्हणाले. खडसेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून फडणवीस आणि खडसेंमधील दुरावा खरंच कमी झाला आहे की नाही, याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.

हेही वाचा - 'राज्यकर्ते अजून किती निर्भयांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहेत'

फोन टॅपिंग दुर्दैवीच -

फडणवीस सरकारच्या काळात माझे फोन टॅप झाल्याची बातमी मी वृत्तपत्रांतून वाचली. वृत्तपत्राच्या बातमीवर माझा विश्वास नाही. मात्र, जर खरंच माझे फोन टॅप झाले असतील तर ही बाब दुर्दैवी आहे. माझेच नाही तर अन्य कोणाचेही फोन टॅपिंग होणं समर्थनीय नाही, अशी प्रतिक्रिया खडसेंनी यावेळी फोन टॅपिंग प्रकरणासंदर्भात दिली. राज्य सरकारने आता फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत सत्य बाहेर येईलच. त्यामुळे या प्रकरणासंदर्भात अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही, असे खडसे यावेळी म्हणाले.

4 वर्षांत 'महानंद'ची भरारी -

गेल्या आठवड्यात जळगाव दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते सुनील केदार यांनी महानंदमध्ये खडसेंनी केवळ राजकारण केल्याची टीका केली होती. केदार यांच्या टीकेला खडसेंनी प्रत्युत्तर दिले आहे. 15 वर्षांपूर्वी मुंबईतील महानंद दूध संघ प्रगतीपथावर होता. मात्र, नंतरच्या कालखंडात महानंदमध्ये प्रचंड राजकारण वाढले. त्यामुळे हा दूध संघ डबघाईला आला होता. मात्र, 4 वर्षांपूर्वी या दूध संघात सत्तांतर घडले. त्यानंतर महानंदने पुन्हा उभारी घेतली. आता हा दूध संघ आयएसओ मानांकन प्राप्त करणारा दूध संघ ठरला आहे, असेही खडसे यावेळी म्हणाले.

Intro:जळगाव
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे केंद्र जाणार असल्याच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत. ते केंद्रात जाणार असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. या गोष्टीचे मी स्वागत करेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.Body:एकनाथ खडसे आज सकाळी जळगावात त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खडसेंनी फोन टॅपिंग, फडणवीस यांच्या केंद्रात जाण्याची चर्चा, मुंबईतील महानंदच्या कारभारसंदर्भात मत मांडले. ते पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे केंद्र जाणार असल्याच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत. ते खरंच केंद्रात जाणार असतील तर मी या गोष्टीचे स्वागत करेल. ते अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा केंद्राला तर फायदा होईलच शिवाय राज्यालाही केंद्राच्या अनेक योजना पदरी पाडून घेण्यास मदत होईल. आपला एखादा जवळचा नेता केंद्रात जात असेल तर त्याचा आपल्यालाच फायदा होतो, असे खडसे यावेळी म्हणाले. खडसेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून फडणवीस आणि खडसेंमधील दुरावा खरंच कमी झाला आहे की नाही, याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.

फोन टॅपिंग दुर्दैवीच-

फडणवीस सरकारच्या काळात माझे फोन टॅप झाल्याची बातमी मी वृत्तपत्रांतून वाचली. वृत्तपत्राच्या बातमीवर माझा विश्वास नाही. परंतु, जर खरंच माझे फोन टॅप झाले असतील तर ही बाब दुर्दैवी आहे. माझेच नाही तर अन्य कोणाचेही फोन टॅपिंग होणं समर्थनीय नाही, अशी प्रतिक्रिया खडसेंनी यावेळी फोन टॅपिंग प्रकरणासंदर्भात दिली. राज्य सरकारने आता फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत सत्य बाहेर येईलच. त्यामुळे या प्रकरणासंदर्भात अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही, असे खडसे यावेळी म्हणाले.Conclusion:4 वर्षांत 'महानंद'ची भरारी-

गेल्या आठवड्यात जळगाव दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते सुनील केदार यांनी महानंदमध्ये खडसेंनी केवळ राजकारण केल्याची टीका केली होती. केदार यांच्या टीकेला खडसेंनी प्रत्युत्तर दिले आहे. 15 वर्षांपूर्वी मुंबईतील महानंद दूध संघ प्रगतीपथावर होता. मात्र, नंतरच्या कालखंडात महानंदमध्ये प्रचंड राजकारण वाढले. त्यामुळे हा दूध संघ डबघाईला आला होता. परंतु, 4 वर्षांपूर्वी या दूध संघात सत्तांतर घडले. त्यानंतर महानंदने पुन्हा उभारी घेतली. आता हा दूध संघ आयएसओ मानांकन प्राप्त करणारा दूध संघ ठरला आहे, असेही खडसे यावेळी म्हणाले.
Last Updated : Feb 7, 2020, 12:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.