ETV Bharat / state

संचारबंदीतही केळी वाहतुकीस परवानगी; जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा - केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

राज्य शासनाने केळी मालाच्या वाहतुकीस संचारबंदीतही परवानगी दिल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

banana producers welcomes government decision for banana transporation during lockdown period
संचारबंदीतही केळी वाहतुकीस परवानगी; जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
author img

By

Published : Mar 27, 2020, 5:53 PM IST

जळगाव - केळी वाहतुकीस येणारी अडचण दूर झाल्यामुळे शुक्रवारपासून जळगाव जिल्ह्यात केळी कापणीला सुरुवात झाली आहे. कापलेल्या केळीचा माल ट्रकमध्येही भरला जाऊ लागला आहे. अत्यावश्यक घटक म्हणून राज्य शासनाने केळी मालाच्या वाहतुकीस संचारबंदीतही परवानगी दिल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

राज्य शासनाच्या निर्णयामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार शिरीष चौधरी आणि चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडला होता. पालकमंत्र्यांनी या प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यावर त्यावर तोडगा निघाला. कोरोनाचा संसर्ग अधिक होऊ नये, यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. अशातच माल वाहतूक ठप्प झाल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. देशभर लॉकडाऊन असल्यामुळे उत्तर भारतातील बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्तरेकडील बाजारात नेण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे घामाने पिकवलेल्या सोन्यासारख्या शेतमालाची माती होते की काय? अशी महाभयंकर परिस्थिती केळी उत्पादक शेतकऱ्यांवर ओढावली होती.

केळीला अत्यावश्यक सेवेचा दर्जा मिळून तिच्या वाहतुकीस परवानगी मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. रावेरचे आमदार शिरीष चौधरी तसेच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न लक्षात घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांची कैफियत मांडली. त्यानुसार गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंजाब, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केल्याने केळी निर्यातीचा मार्ग मोकळा झाला.

केळी मजुरांची सुरक्षा -

दरम्यान, केळी मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. मात्र, एका मालगाडीवर किमान 20 ते कमाल 40 मजूर केळी भरण्यासाठी लागतात. सुरक्षेसाठी त्यांनी तोंडाला मास्क व हातमोजे घालणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे माल भरताना मजुरांनी एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर राखणेही आवश्यक आहे, असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.