ETV Bharat / state

दुष्काळासह अतिउष्ण तापमानामुळे 'बनाना बेल्ट'ची गेली रया, जळगाव जिल्ह्यातील ३२ हजार हेक्टरवरील केळी धोक्यात - ठिबक सिंचन

एकीकडे शेतकरी दुष्काळाचा सामना करत असतानाच दुसरीकडे तापमान वाढीने अक्षरशः कहरच केला. अतिउष्ण तापमानाचा फटका केळी बागांना बसत आहे. मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील तापमान ४२ ते ४६ अंशांदरम्यान स्थिरावत असल्याने नवतीच्या (नव्याने लागवड केलेली बाग) केळीच्या बागा करपून गेल्या आहेत. त्याचप्रमाणे पिलबागांचे (दुबार बहर असलेली बाग) निसवणीवर आलेले केळीचे घड तुटून नुकसान होत आहे. काही बागांमध्ये केळीचे खोड मधून तुटून पडत आहेत. उष्णतेची लाट कायम राहिली तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेकडो कोटींचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील ३२ हजार हेक्टरवरील केळी धोक्यात
author img

By

Published : May 5, 2019, 8:42 AM IST

Updated : May 5, 2019, 8:26 PM IST

जळगाव - 'खानदेशचा कॅलिफोर्निया' अशी ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यातील 'बनाना बेल्ट'ची दुष्काळ आणि अतिउष्ण तापमानामुळे रया गेली (खराब होणे) आहे. दुष्काळामुळे घटलेली भूजल पातळी आणि सरासरी ४५ अंशापेक्षा जास्त तापमानामुळे जिल्ह्यातील सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी धोक्यात आली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारणच अडचणीत आले आहे.

दुष्काळ, अतिउष्ण तापमानामुळे 'बनाना बेल्ट'ची गेली रया; जळगाव जिल्ह्यातील ३२ हजार हेक्टरवरील केळी धोक्यात

जळगाव जिल्ह्यातील तापी-पूर्णा, सुकी, मोर, अनेर, गिरणा आणि वाघूर या प्रमुख नद्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात केळी लागवड केली जाते. त्यापैकी सर्वाधिक लागवड ही जळगाव, रावेर, यावल, चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यात होते. गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे यावर्षी दुष्काळाचे संकट ओढवले. एकीकडे शेतकरी दुष्काळाचा सामना करत असतानाच दुसरीकडे तापमान वाढीने अक्षरशः कहरच केला. अतिउष्ण तापमानाचा फटका केळी बागांना बसत आहे. मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील तापमान ४२ ते ४६ अंशांदरम्यान स्थिरावत असल्याने नवतीच्या (नव्याने लागवड केलेली बाग) केळीच्या बागा करपून गेल्या आहेत. त्याचप्रमाणे पिलबागांचे (दुबार बहर असलेली बाग) निसवणीवर आलेले केळीचे घड तुटून नुकसान होत आहे. काही बागांमध्ये केळीचे खोड मधून तुटून पडत आहेत. उष्णतेची लाट कायम राहिली तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेकडो कोटींचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा प्रसंगी टँकरने पाणी आणून मोठ्या मेहनतीने केळी बागा जगवल्या. मात्र, अतिउष्ण तापमानामुळे बागा करपल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे. अतिउष्ण तापमानामुळे केळी बागांचे होणारे नुकसान हे नैसर्गिक आपत्ती मानली जात नसल्याने शेतकऱ्यांना पिकविम्याचा दावा करता येत नाही. ही बाब लक्षात घेता शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून अतिपाऊस, वादळ, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीत अतिउष्ण तापमानामुळे केळी बागांचे होणाऱ्या नुकसानीचा समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

दुष्काळी परिस्थिती आणि अतिउष्ण तापमानामुळे जळगाव जिल्ह्यातील सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आहे. त्यात रावेर तालुक्यातील सुमारे १६ हजार, यावल तालुक्यातील साडेसहा हजार, मुक्ताईनगर तालुक्यातील ३ हजार, जळगाव तालुक्यातील २ हजार तर चोपडा तालुक्यातील सुमारे ६ हजार हेक्टरवरील केळी बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या आहेत. दुष्काळ आणि तापमानवाढ अशीच कायम राहिली तर केळीचे आगार म्हणून असलेली जळगावची ओळख नामशेष होण्याची भीती आहे.

Intro:Feed send to FTP
जळगाव
'खान्देशचा कॅलिफोर्निया' अशी ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यातील 'बनाना बेल्ट'ची दुष्काळ आणि अतिउष्ण तापमानामुळे रया गेली आहे. दुष्काळामुळे घटलेली भूजल पातळी आणि सरासरी ४५ अंशांपेक्षा जास्त तापमानामुळे जिल्ह्यातील सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी धोक्यात आली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारणच अडचणीत आले आहे.Body:जळगाव जिल्ह्यातील तापी-पूर्णा, सुकी, मोर, अनेर, गिरणा आणि वाघूर या प्रमुख नद्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात केळी लागवड केली जाते. त्यापैकी सर्वाधिक लागवड ही जळगाव, रावेर, यावल, चोपडा आणि मुक्ताईनगर तालुक्यात होते. गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे यावर्षी दुष्काळाचे संकट ओढवले. एकीकडे शेतकरी दुष्काळाचा सामना करत असतानाच दुसरीकडे तापमान वाढीने अक्षरशः कहरच केला. अतिउष्ण तापमानाचा फटका केळी बागांना बसत आहे. मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील तापमान ४२ ते ४६ अंशांदरम्यान स्थिरावत असल्याने नवतीच्या (नव्याने लागवड केलेली बाग) केळीच्या बागा करपून गेल्या आहेत. त्याचप्रमाणे पिलबागांचे (दुबार बहर असलेली बाग) निसवणीवर आलेले केळीचे घड तुटून नुकसान होत आहे. काही बागांमध्ये केळीचे खोड मधून तुटून पडत आहेत. उष्णतेची लाट कायम राहिली तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेकडो कोटींचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा प्रसंगी टँकरने पाणी आणून मोठ्या मेहनतीने केळी बागा जगवल्या. मात्र, अतिउष्ण तापमानामुळे बागा करपल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे. अतिउष्ण तापमानामुळे केळी बागांचे होणारे नुकसान हे नैसर्गिक आपत्ती मानली जात नसल्याने शेतकऱ्यांना पिकविम्याचा दावा करता येत नाही. ही बाब लक्षात घेता शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून अतिपाऊस, वादळ, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीत अतिउष्ण तापमानामुळे केळी बागांचे होणाऱ्या नुकसानीचा समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.Conclusion:दुष्काळी परिस्थिती आणि अतिउष्ण तापमानामुळे जळगाव जिल्ह्यातील सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आहे. त्यात रावेर तालुक्यातील सुमारे १६ हजार, यावल तालुक्यातील साडेसहा हजार, मुक्ताईनगर तालुक्यातील ३ हजार, जळगाव तालुक्यातील २ हजार तर चोपडा तालुक्यातील सुमारे सहा हजार हेक्टरवरील केळी बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या आहेत. दुष्काळ आणि तापमानवाढ अशीच कायम राहिली तर केळीचे आगार म्हणून असलेली जळगावची ओळख नामशेष होण्याची भीती आहे.
Last Updated : May 5, 2019, 8:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.