ETV Bharat / state

जळगावात गाळेधारकांकडून महापालिका उपायुक्तांना दुकानात डांबण्याचा प्रयत्न - जळगाव गाळेधारक

मुदत संपलेले गाळे सील करण्यासाठी गेलेल्या महापालिका उपायुक्तांना गाळेधारकांनी दुकानात डांबण्याचा प्रयत्न केला. काल (सोमवार) दुपारी हा खळबळजनक प्रकार घडला.

गाळेधारकांचा उडालेला गोंधळ
author img

By

Published : Oct 15, 2019, 7:56 AM IST

Updated : Oct 15, 2019, 8:05 AM IST

जळगाव - महापालिका मालकीच्या फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील मुदत संपलेले गाळे सील करण्यासाठी गेलेल्या महापालिका उपायुक्तांना गाळेधारकांनी दुकानात डांबण्याचा प्रयत्न केला. काल (सोमवार) दुपारी हा खळबळजनक प्रकार घडला. दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणल्याने आठ गाळेधारकांवर गुन्हा दाखल झाला. दुसरीकडे, गाळेधारकांनी या कारवाईचा निषेध करत मार्केट बंद करुन शहर पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी केल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

गाळेधारक आणि उपायुक्तांमधला वाद

जळगाव महापालिका मालकीच्या फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील भाडे कराराची मुदत संपलेल्या साडेनऊशे गाळेधारकांना ८१ क च्या नोटिसा बजावून ११ ऑक्‍टोबरपर्यंत पैसे भरण्याची मुदत दिली होती. शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने दोन दिवसाची मुदतवाढ देवूनही अनेक गाळेधारकांनी थकबाकी भरली नाही. अशा थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाई करण्यासाठी उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे हे अतिक्रमण व किरकोळ वसुली विभागाच्या पथकासह फुले मार्केटमधे गेले होते. यावेळी फत्तेचंद जसुमल सिंधी यांचे ११५, ११६ व ११७ असे तीन गाळे सुरुवातीला सील करण्यात आले. सील व पंचनामा पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या पथकाने आनंद रोषनलाल नाथाणी यांच्या दोन गाळ्यांपैकी एक गाळा सील केला. दुसरा गाळा सील करत असताना उपायुक्त व अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक दुकानात असतानाच अचानक सुमारे २५ ते ३० व्यापारी दुकानात घुसले. त्यांनी उपायुक्तांसह पथकातील कर्मचाऱ्यांना घेराव घातला. गुट्टे त्यांना बाहेर निघण्याची विनंती करीत असताना काही जणांनी एक ते दोन वेळा लाईट बंद करीत उपायुक्त गुट्टे व पथकातील कर्मचाऱ्यांना दुकानातून बाहेर जाण्यास प्रतिबंध केला. तसेच गुट्टे यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यावेळी उपायुक्तांसह कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत दुकानातून पाय काढता घेत थेट शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

हेही वाचा - रॅगिंगमुळे भंगले 'त्याचे' डॉक्टर होण्याचे स्वप्न!

पोलीस ठाण्यातही गोंधळ

उपायुक्त गुट्टे व त्यांचे पथक मार्केट समोरच असलेल्या शहर पोलीस ठाण्यात जात असताना त्यांचा पाठलाग करीत नाथानी यांनी त्यांना तेथे खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. पोलीस ठाण्याच्या आवारातच उपायुक्त व नाथानी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. शहर पोलीस ठाण्यात गोंधळ सुरु असताना दुसरीकडे उर्वरित गाळेधारकांनी फुले मार्केट बंद करीत महापालिका प्रशासनाच्या कारवाईचा निषेध करीत घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे फुले व सेंट्रल फुले मार्केटमध्ये दुपारी तणाव निर्माण झाला.

हेही वाचा - गुलाबराव पाटील म्हणतात.. भाजपने बंडोबांना थंड करावे, अन्यथा...

उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारी कामात अडथळा आणणे, डांबण्याचा प्रयत्न, धक्काबुक्की तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी गाळेधारक आनंद रोशनलाल नाथानी, महेंद्र रोशनलाल नाथानी, देवेंद्र फुलचंद्र चोपडा, शितलदास हरिओम जवाहराणी, जितू परवाणी, नंदलाल गेलाराम लुल्ला, विशनदास लोचाराम कावना यांच्यासह आणखी ३ ते ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:जळगाव
महापालिका मालकीच्या फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील मुदत संपलेले गाळे सील करण्यासाठी गेलेल्या महापालिका उपायुक्तांना गाळेधारकांनी दुकानात डांबण्याचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी हा खळबळजनक प्रकार घडला. दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणल्याने आठ गाळेधारकांवर गुन्हा दाखल झाला. दुसरीकडे, गाळेधारकांनी या कारवाईचा निषेध करीत मार्केट बंद करुन शहर पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी केल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.Body:जळगाव महापालिका मालकीच्या फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील भाडे कराराची मुदत संपलेल्या साडेनऊशे गाळेधारकांना ८१ क च्या नोटिसा बजावून ११ ऑक्‍टोबरपर्यंत पैसे भरण्याची मुदत दिली होती. शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने दोन दिवसाची मुदतवाढ देवूनही अनेक गाळेधारकांनी थकबाकी भरली नाही. अशा थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाई करण्यासाठी उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे हे अतिक्रमण व किरकोळ वसुली विभागाच्या पथकासह फुले मार्केटमधे गेले होते. यावेळी फत्तेचंद जसुमल सिंधी यांचे ११५, ११६ व ११७ असे तीन गाळे सुरुवातीला सील करण्यात आले. सील व पंचनामा पूर्ण झाल्यानंतर महापालिकेच्या पथकाने आनंद रोषणलाल नाथाणी यांच्या दोन गाळ्यांपैकी एक गाळा सील केला. दुसरा गाळा सील करत असताना उपायुक्त व अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक दुकानात असतानाच अचानक सुमारे २५ ते ३० व्यापारी दुकानात घुसले. त्यांनी उपायुक्तांसह पथकातील कर्मचाऱ्यांना घेराव घातला. गुट्टे ग्राहकांना बाहेर निघण्याची विनंती करीत असताना काही जणांनी एक ते दोन वेळा लाईट बंद करीत उपायुक्त गुट्टे व पथकातील कर्मचाऱ्यांना दुकानातून बाहेर जाण्यास प्रतिबंध केला. तसेच गुट्टे यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यावेळी उपायुक्तांसह कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत दुकानातून पाय काढता घेत थेट शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलीस ठाण्यातही गोंधळ-

उपायुक्त गुट्टे व त्यांचे पथक मार्केट समोरच असलेल्या शहर पोलीस ठाण्यात जात असताना त्यांचा पाठलाग करीत नाथानी यांनी त्यांना तेथे खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. पोलीस ठाण्याच्या आवारातच उपायुक्त व नाथानी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. शहर पोलीस ठाण्यात गोंधळ सुरु असताना दुसरीकडे उर्वरित गाळेधारकांनी फुले मार्केट बंद करीत महापालिका प्रशासनाच्या कारवाईचा निषेध करीत घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे फुले व सेंट्रल फुले मार्केटमधे दुपारी तणाव निर्माण झाला.Conclusion:आठ गाळेधारकांविरुद्ध गुन्हा-

उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारी कामात अडथळा आणणे, डांबण्याचा प्रयत्न, धक्काबुक्की तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी गाळेधारक आनंद रोशनलाल नाथानी, महेंद्र रोशनलाल नाथानी, देवेंद्र फुलचंद्र चोपडा, शितलदास हरिओम जवाहराणी, जितू परवाणी, नंदलाल गेलाराम लुल्ला, विशनदास लोचाराम कावना यांच्यासह ३ ते ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : Oct 15, 2019, 8:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.