जळगाव - यावल तालुक्यातील अट्रावल येथील जागृत मुंजोबा देवस्थान येथील सालाबादाप्रमाणे भरणारी यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. यंदा दिनांक 13 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आली आहे. यावल येथील तहसील कार्यालयात तहसिलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनात 4 फेब्रुवारी रोजी बैठक झाली. यात मुंजोबा देवस्थानाची यात्रा यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुकाने, हॉटेल्स, दुकाने लावू नये
यात्रेत आकाश पाळणे, लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने, महिलांसाठी मिळणारी संसार उपयोगी वस्तुंची दुकाने लाकडी तसेच इतर साहित्याची दुकाने, हॉटेल्स, थंडपेय विक्रीची दुकाने यांना परवानगी दिली जाणार नाही. बैठकीला पोलीस उप निरिक्षक ए आर पठाण, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले तसेच देवस्थानाचे विश्वस्त ललीत कोळी, दिपक तायडे, प्रभाकर कोळी, अनिल कोळी, जनार्दन कोळी, विक्रम कोळी व अट्रावल पोलीस पाटील पवन चौधरी उपस्थित होते.
हेही वाचा - एचआयव्हीग्रस्त बालकांना शाळेतून हाकलले, बीडमधील निंदाजनक प्रकार