ETV Bharat / state

'राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांना पात्रतेनुसार पदोन्नती देणार' - महिला व बाल विकास मंत्री अ‌ॅड यशोमती ठाकूर

जळगाव जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंत्री ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल विकास विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना पात्रतेनुसार पदोन्नती देणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री अ‌ॅड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

यशोमती ठाकूर
यशोमती ठाकूर
author img

By

Published : Nov 27, 2020, 5:16 PM IST

जळगाव - कोरोनाच्या काळात खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना पात्रतेनुसार पदोन्नती देणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री अ‌ॅड यशोमती ठाकूर यांनी दिली. येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंत्री ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल विकास विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी त्या बोलत होत्या.

बैठकीस जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील आमदार शिरीष चौधरी, आमदार लता सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महिला व बाल कल्याण सभापती ज्योती पाटील, जि. प. गटनेते प्रभाकर सोनवणे, विभागीय उपायुक्त चंद्रकांत पगारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

जळगाव जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंत्री ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

ग्रामपंचायतीमध्ये ग्राम बालसंरक्षण समिती -

बालकांचे संरक्षण होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम बालसंरक्षण समिती स्थापन करणे आवश्यक आहे. तसेच ग्राम बालसंरक्षण केंद्र स्थापन करावे. प्रत्येक गावात सुसज्ज अशा अंगणवाड्या असाव्यात याकरीता जिल्हा परिषदेच्या सेस व जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून अंगणवाडीचे बांधकाम करण्यात यावेत. तसेच या ठिकाणी मुलांना पिण्याचे स्वच्छ पाणी व शौचालयाची व्यवस्था असणे आवश्यक आहे.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम -

कोरोनाच्या काळात राज्य शासनाच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांचे मानधन वेळेवर दिले पाहिजे. जिल्ह्यातील महिला व बालकांचा विकास व्हावा, त्यांचे संरक्षण व्हावे, याकरीता प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन उभारण्यात येणार आहे. त्याकरीता तातडीने जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून 3 टक्के निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विभागास मिळणाऱ्या निधीचा वापर योग्य पद्धतीने करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात जास्तीत जास्त अंगणवाड्या आयएसओ मानांकित करण्यात याव्यात. तसेच स्मार्ट अंगणवाड्याची संख्या वाढवावी. महिलांच्या संरक्षणास व समुपदेशनास प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागास दिले.

विविध योजनांचा आढावा -

महिला अत्याचाराच्या घटना, कुमारी मातांचे प्रमाण, मुलींचे गुणोत्तर, पीसीपीएनडीसी कायदा, पूरक पोषण आहार योजना, कुपोषित बालकांचे प्रमाण, माझी कन्या भाग्यश्री योजना, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना एकरकमी लाभ प्रकरणे, अंगणवाडी इमारत बांधकामाची स्थिती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना आदींचा ठाकूर यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. तडवी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी विभागाचा आढावा सादर केला.

बेटी बचाओ, बेटी पढाओ ‘डिजिटल डॉल’ चे उद्घाटन -

यावेळी मंत्री ठाकूर यांच्या हस्ते बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातंर्गत तयार करण्यात आलेल्या ‘डिजिटल डॉल’चे उद्घाटन करण्यात आले. तसेच माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे, अनाथ मुलांना प्रमाणपत्राचे, तेजस्वी फायनान्स कार्यक्रमातंर्गत कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या महिलांना मदत धनादेशाचे वितरण प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आले. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने बिसमिल्ला स्वयंसहाय्यता बचत गट, मेहरुण, धनलक्षमी महिला बचत गट, बांभोरी यांना मंजूर केलेल्या कर्जाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित होऊन चार अंगणवाडी सेविकांच्या मृत्यू झाला. यावेळी त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.