ETV Bharat / state

जळगाव : मद्यतस्करी प्रकरणात तिघे पोलीस कर्मचारी बडतर्फ, एक निलंबित, निरीक्षकावरही टांगती तलवार! - jalgaon latest news

या प्रकरणातील 'मास्टरमाइंड' एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यावरही कडक कारवाईची टांगती तलवार कायम आहे, त्यांच्यावरही लवकरच कारवाई होईल, असे संकेत पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

जळगाव
जळगाव
author img

By

Published : Apr 28, 2020, 6:06 PM IST

जळगाव - लॉकडाऊनच्या काळात मद्यतस्करी केल्याचे प्रकरण जळगाव पोलीस दलातील चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. याप्रकरणी विशेष समितीकडून झालेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना थेट सेवेतूनच बडतर्फ करण्यात आले आहे, तर एकाला निलंबित केले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी मंगळवारी ही कारवाई केली.

या प्रकरणातील 'मास्टरमाईंड' एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यावरही कडक कारवाईची टांगती तलवार कायम आहे, त्यांच्यावरही लवकरच कारवाई होईल, असे संकेत पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक जीवन काशिनाथ पाटील, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजय जगन्नाथ जाधव, मुख्यालयातील पोलीस नाईक मनोज केशव सुरवाडे अशी बडतर्फ झालेल्या तिघांची नावे आहेत. तर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल भारत शांताराम पाटील यांना याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ हे देखील या प्रकरणात दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून महासंचालकांकडे रवाना झाला आहे. महासंचालक कार्यालयाकडून निर्देश आल्यानंतर त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.

शहरातील अजिंठा चौफुलीवरील आर. के. वाईन शॉप तसेच त्यांच्या दोन गोदामांमधून लॉकडाऊनच्या काळात मद्यतस्करी केल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे पोलीस तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह काही पोलीस कर्मचारी सहभागी असल्याचे स्पष्ट झाले होते. मद्यतस्करी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह जळगाव पोलीस दलातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू होती. त्यामुळे हे प्रकरण त्यांना चांगलेच महागात पडणार असल्याची चिन्हे सुरुवातीपासून दिसत होती. विशेष चौकशी समितीने केलेल्या चौकशीत सर्व दोषी आढळल्याने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी ही कारवाई केली.

रणजित शिरसाठ अपसंपदेचे धनी?

निरीक्षक रणजित शिरसाठ यांची तडकाफडकी उचलबांगडी करत त्यांच्याकडून एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार काढून घेतला आहे. सध्या ते 'कंट्रोल' जमा आहेत. दरम्यान, या साऱ्या प्रकरणात रणजित शिरसाठ हे 'मास्टरमाइंड' असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यांनी मद्य तस्करीच्या माध्यमातून काही अपसंपदा जमवली आहे का? याचाही तपास केला जात आहे. त्यामुळे शिरसाठ यांच्या संपत्तीची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आर. के. वाईन प्रकरणात त्यांची भागीदारी होती का? या दृष्टीनेही चौकशी होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.