ETV Bharat / state

जळगाव जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस आसिफ खान यांचा अपघाती मृत्यू - जळगाव जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मृत्यू

आसिफ खान इस्माईल खान हे जळगाव जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस होते. ते काँग्रेसचे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष आत्माराम जाधव व ऍड. संतोष इंगळे यांच्यासोबत मंगळवारी औरंगाबाद येथे गेले होते. औरंगाबाद येथील काम आटपून ते रात्री त्यांच्या कारने मुक्ताईनगरला परत येत होते. जालना-सिंदखेडराजा मार्गावर त्यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली.

जळगाव जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस आसिफ खान

author img

By

Published : Feb 10, 2021, 10:49 AM IST

जळगाव - जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस आसिफ खान इस्माईल खान यांचा मंगळवारी रात्री अपघाती मृत्यू झाला आहे. औरंगाबाद येथून मुक्ताईनगरला परत येत असताना त्यांच्या कारचा जालना-सिंदखेडराजा मार्गावर अपघात झाला. या अपघातात आसिफ खान यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे दोन सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

आसिफ खान इस्माईल खान हे जळगाव जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस होते. ते काँग्रेसचे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष आत्माराम जाधव व ऍड. संतोष इंगळे यांच्यासोबत मंगळवारी औरंगाबाद येथे गेले होते. औरंगाबाद येथील काम आटपून ते रात्री त्यांच्या कारने मुक्ताईनगरला परत येत होते. जालना-सिंदखेडराजा मार्गावर त्यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात आसिफ खान यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांच्यासोबत असलेले आत्माराम जाधव व ऍड. संतोष इंगळे हे गंभीररित्या जखमी झाले. दोन्ही जखमींना जालना येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

आप्तस्वकियांनी घेतली धाव -

या अपघाताची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कारची माहिती घेतली असता ती जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील असल्याचे समजल्यानंतर कारमधील तिघांची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी खान यांच्या कुटुंबियांशी संपर्क करून अपघाताची माहिती दिली. ही माहिती मिळताच खान यांच्यासह जाधव व ऍड. इंगळे यांच्या आप्तस्वकियांनी औरंगाबादकडे धाव घेतली. दरम्यान, खान यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा - ''विकेटकीपिंगच्या बाबतीत पंत पाळण्यातल्या मुलासारखा'', दिग्गज क्रिकेटपटूने दिले मत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.