ETV Bharat / state

हळदीच्या कार्यक्रमात तलवार घेऊन नाचणे भोवले; तरुणास अटक

जळगावातील हरी विठ्ठलनगर भागातील हातात तलवार घेऊन नाचणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याचा हा नाचतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

a young man Dancing with swords in marriage event in jalgoun
हळदीच्या कार्यक्रमात तलवार घेऊन नाचणे भोवले; तरुणास अटक
author img

By

Published : Dec 21, 2020, 12:59 PM IST

जळगाव- हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवार घेऊन नाचणाऱ्या एका तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. प्रमोद शरद इंगळे (२६, रा. हरिविठ्ठलनगर, जळगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रमोद हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवार घेऊन दहशत माजवत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्याची दखल घेऊन पोलिसांनी तातडीने अटकेची कारवाई केली.

हळदीच्या कार्यक्रमात तलवार घेऊन नाचणे भोवले; तरुणास अटक

दहशत पसरवण्याचा प्रयत्न-

प्रमोद इंगळे काही दिवसांपूर्वी हरी विठ्ठलनगर भागातील हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवार घेऊन नाचत होता. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर १९ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा तो हातात तलवार घेवून बाजार पट्ट्याजवळ आरडाओरड करत दहशत माजवत होता. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

दोन हजार रुपये किंमतीची तलवार जप्त-

पोलिसांनी प्रमोदकडून २ हजार रुपये किंमतीची तलवार जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी पंकज शिंदे यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.