ETV Bharat / state

Power Step Project : अमळनेर नगरपालिकेचा अनोखा उपक्रम; प्रवेशद्वारात पाऊल ठेवताच तयार होते एक युनिट ऊर्जा - Energy saving message through power step unit

अमळनेर नगरपालिकेत ठेवलेले तुमचे पाऊल वाया जाणार नाही, तर उलट 12 व्होल्टेजची ऊर्जा निर्माण करणार आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषदेने 'पॉवर स्टेप' ( Power Step ) च्या माध्यमातून ऊर्जेचे पाऊल उचलले आहे.

Power Step
Power Step
author img

By

Published : May 10, 2022, 5:44 PM IST

जळगाव: असं म्हणतात शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, शासकीय कार्यालयात खेटरा मारून चपला झिजल्या, अशा म्हणी ऐकल्या आहेत. मात्र आता अमळनेर नगरपालिकेत ठेवलेले तुमचे पाऊल वाया जाणार नाही, तर उलट 12 व्होल्टेजची ऊर्जा निर्माण करणार आहे.जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषदेने 'पॉवर स्टेप' च्या माध्यमातून ऊर्जेचे पाऊल उचलले आहे. पाहुयात कशी तयार होते उर्जा.

पाय पडताच तयार होते 12 होल्ट वीज - जळगावात जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर एक पॉवर स्टेप बसवण्यात आली आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पाऊल या स्टेपवर पडताच किमान 12 व्होल्ट ऊर्जा म्हणजे एक युनिट ऊर्जा तयार होईल, असे उपकरण पालिकेचे विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर यांनी तयार केले आहे.

प्रवेशद्वारात पाऊल ठेवताच तयार होते एक युनिट ऊर्जा

रोज 1000 पावले या उपकरणावर पडतात - अमळनेर पालिकेत दररोज सुमारे साडे तीनशे चारशे नागरिक वेगवेगळ्या कामानिमित्त ये-जा करीत असतात. तसेच पालिकेचे 150 कर्मचारी आहेत. म्हणजे सरासरी रोज 500 पावले येण्याचे आणि 500 पावले जाण्याचे असे 1000 पावले या उपकरणावर पडतात. ज्यामुळे यातून सुमारे 1 हजार युनिट ऊर्जा दररोज तयार होते. ही ऊर्जा एका बॅटरी मध्ये साठवण्यात येते. या बॅटरीला पूर्ण चार्ज होण्यासाठी सहा ते सात तास लागतात. या बॅटरीचा बॅकअप किमान 12 तास आहे. या बॅटरीतील तयार झालेली ऊर्जा अंमळनेर नगरपालिकेतर्फे इतर ठिकाणी वापरात येते.

अनोख्या उपक्रमाचे जिल्ह्याभर एकच चर्चा - पालिकेत प्रवेशद्वारावर पाय ठेवण्यासाठी स्प्रिंग असलेली स्टेप आहे. त्यावर पाय ठेवताच स्प्रिंग दाबली जाऊन ऊर्जा तयार होते.ती ऊर्जा बॅटरीमध्ये साठवून पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला मोशन सेन्सर्स लावण्यात आले आहेत. यात ही उर्जा वापरात येते. या अनोख्या उपक्रमामुळे ऊर्जा निर्मिती होत एक अनोखा आणि चांगला उपक्रम पालिकेतर्फे हाती घेण्यात आल्याने ग्रामस्थांनी याचे कौतुक करत आहेत.

उपकरणाचे ग्रामस्थांकडून कौतुक - भविष्यात अनुदान मिळाल्यास, अथवा सामाजिक कार्यकर्त्यानी योगदान दिल्यास फिझो इलेक्टरीक क्रिस्टल चा वापर करून अधिक ऊर्जा निर्माण होऊ शकते. 1 मिमीचा क्रिस्टल 40 हजाराला मिळतो. त्याला नुसत्या हाताच्या अंगठ्याने दाबले, तरी मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होईल. यामुळे ऊर्जा तयार होणे व ऊर्जाबचतीमुळे मोठा फायदा नगरपालिकेला होत आहे. हे अनोखे उपक्रम अमळनेर नगर पालिकेचे विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर यांनी बनविलेल आहे. हे एक अनोखे उपकरण पाहायला आम्हालाही खूप चांगले वाटते.

इतर नगरपंचायतीने असे उपकरण बनवावे - पालिकेत हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पालिकेच्या मालकीच्या इतर इमारती, सामाजिक सभागृह, सार्वजनिक शौचालये,उद्याने यात देखील या यंत्रणा लावण्यात येणार आहे. उद्यानात मुलांच्या खेळण्याने, नागरिकांच्या व्यायामाने देखील ऊर्जा निर्मिती, या पावर स्टेप उपकरणाच्या माध्यमातून भविष्यात होईल. मात्र इतरही नगरपालिकेने या उपकरणाची माहिती घेऊन आपल्या पालिकेतही उर्जा बचतीचे, असे विविध उपक्रम राबवावेत. जेणेकरून भविष्यात होणारी विजेचा तुटवडा जाणवणार नाही.

हेही वाचा -Video : जळगावात मनसे पदाधिकाऱ्यांकडून हनुमान मंदिरात आरती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.