ETV Bharat / state

मुसळधार पावसामुळे जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील पूल गेला वाहून; वाकोदचा तुटला संपर्क

मुसळधार पावसामुळे शनिवारी सायंकाळी जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील वाकोद-पहूर रस्त्यावरील नाल्यावर असलेल्या पुलाचा भाग वाहून गेला. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

मुसळधार पावसामुळे जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील पुलाचा भाग वाहाला
author img

By

Published : Nov 3, 2019, 12:32 PM IST

Updated : Nov 3, 2019, 12:52 PM IST

जळगाव- अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे शनिवारी सायंकाळी जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील वाकोद-पहूर रस्त्यावरील नाल्यावर असलेल्या पुलाचा भाग वाहून गेला. यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. रस्त्यावरील पुलाचा भाग वाहून गेल्याने वाकोद गावाचा संपर्क तुटला आहे.

मुसळधार पावसामुळे पाण्याने ओसांडून वाहतानाचे नाल्याचे दृश्य

जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे नदी व नाले पुन्हा ओसांडून वाहत आहेत. यातच वाकोद-पहूर रस्त्यावरील नाल्यावर बांधण्यात आलेला पूल पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे.

औरंगाबाद ते जळगाव महामार्ग चौपदरीकरणाचे काम वर्षभरापासून रखडले आहे. या कामात वाकोदजवळील पक्का पूल तोडून त्याठिकाणी पर्यायी रस्ता तयार केला होता. परंतु, सुरुवातीपासूनच हा कच्चा रस्ता होता. परतीच्या मुसळधार पावसाने येथील कच्चा पूल पूर्णपणे वाहून गेला. परिणामी, या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या असून वाकोदसह वाकोदवाडी, पळासखेडा तसेच वडगाव, पिंपळगाव रस्त्याचा संपर्क तुटला आहे. औरंगाबाद ते जळगाव महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी पुन्हा एकदा या घटनेमुळे जोर धरत आहे.

हेही वाचा- तुमचा शपथविधी राहु द्या, मदतीचे काय? गिरिश महाजनांना शेतकऱ्यांचा घेराव

Intro:जळगाव
अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यात सर्वदूर हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे शनिवारी सायंकाळी जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील वाकोद-पहूर रस्त्यावरील नाल्यावर असलेल्या पुलाचा भाग वाहून गेला. यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. रस्त्यावरील पुलाचा भाग वाहून गेल्याने वाकोद गावाचा संपर्क तुटला आहे.Body:जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे नदी व नाले पुन्हा ओसंडून वाहत आहेत. यातच वाकोद- पहूर रस्त्यावरील नाल्यावर बांधण्यात आलेला पूल पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. औरंगाबाद ते जळगाव महामार्ग चौपदरीकरणाचे काम वर्षभरापासून रखडले आहे. या कामात वाकोदजवळील पक्का पुल तोंडून त्याठिकाणी पर्यायी रस्ता तयार केला होता. परंतु, सुरुवातीपासूनच हा कच्चा रस्ता होता. परतीच्या मुसळधार पावसाने येथील कच्चा पूल पूर्णपणे वाहून गेला. परिणामी या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या असून वाकोदसह वाकोदवाडी, पळासखेडा तसेच वडगाव, पिंपळगाव रस्त्याचा संपर्क तुटला आहे.Conclusion:औरंगाबाद ते जळगाव महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी पुन्हा एकदा या घटनेमुळे जोर धरत आहे.
Last Updated : Nov 3, 2019, 12:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.