ETV Bharat / state

दीपनगरात साकारत आहे ६६० मेगावॅट क्षमतेचा सुपर क्रिटीकल प्रकल्प - jalgaon power news

राज्यातील काही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये खर्च व उत्पादनाचा ताळमेळ साधण्यासाठी कसरत करावी लागत असताना दीपनगरात नवा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकारास येत असल्याने या वीजनिर्मिती केंद्राचे वेगळेपण उठून दिसणारे आहे.

jalgaon
jalgaon
author img

By

Published : Jan 13, 2021, 4:06 PM IST

Updated : Jan 13, 2021, 4:26 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात मात्र, ६६० मेगावॅट क्षमतेचा सुपर क्रिटीकल प्रकल्प साकारला जात आहे. येत्या वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा असून, तो कार्यान्वित झाल्यानंतर दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात २४ तासात १८०० मेगावॅटपेक्षा अधिक वीजनिर्मिती शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पात सुपर क्रिटीकल तंत्रज्ञान असल्याने वीजनिर्मिती प्रक्रियेत प्रदूषणाचा स्तर घटणार आहे. राज्यातील काही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये खर्च व उत्पादनाचा ताळमेळ साधण्यासाठी कसरत करावी लागत असताना दीपनगरात नवा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकारास येत असल्याने या वीजनिर्मिती केंद्राचे वेगळेपण उठून दिसणारे आहे.

सद्यस्थितीत होतेय १२०० मेगावॅट वीजनिर्मिती

सध्या दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील संच क्रमांक ३, ४ व ५मधून ११०० ते १२०० मेगावॅटची वीजनिर्मिती करण्यात येत आहे. भविष्यात याठिकाणी ६६० मेगावॅट क्षमतेचा सुपर क्रिटीकल प्रकल्प कार्यान्वित झाल्यास केंद्राची वीजनिर्मिती क्षमता वाढणार आहे. काही दिवसांपूर्वी खर्चाचा विचार करता येथील संच क्रमांक ३मधून वीजनिर्मिती थांबविण्यात आली होती. त्यानंतर कोरोना काळात टाळेबंदी असल्याने विजेची मागणी घटली होती. म्हणून फक्त संच क्रमांक ४ व ५मधून वीजनिर्मिती सुरू होती. परंतु, टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर राज्यभरात विजेची मागणी अचानकपणे वाढली त्यामुळे संच क्रमांक ३मधून पुन्हा वीजनिर्मिती सुरू करण्यात आली.१९६८मध्ये झाली होती पहिल्या संचाची मुहूर्तमेढ-दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रासाठी जुलै १९६८मध्ये ६५ मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक एकची मुहूर्तमेढ रोवली गेली. विदर्भ वगळता खान्देशात सर्वप्रथम वीजनिर्मितीचा बहूमान यानिमित्ताने भुसावळला मिळाला. त्यानंतर ऑगस्ट १९७९मध्ये २१० मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक दोन कार्यान्वित झाला. सप्टेंबर १९८२मध्ये २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन कार्यान्वित झाला. नोव्हेंबर २०१२ व जानेवारी २०१४मध्ये ५०० मेगावॅटचे दोन संच कार्यान्वित झाल्याने दीपनगरची स्थापित क्षमता १४२० मेगावॅट झाली होती. मात्र, मागील काळात ६५ मेगावॅटचा संच क्रमांक एक व २१० मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक दोन कायमस्वरुपी बंद करण्यात आले. यातील संच क्रमांक १ व २ स्क्रॅप करण्यात आले आहेत. आता प्रत्येकी ५०० मेगावॅटचे संच क्रमांक ४ व ५ सह संच क्रमांक ३ मधून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. सध्या केंद्राची स्थापित क्षमता १००० मेगावॅटवर आहे. सध्या प्रकल्पात १४०० कायम तर ३ हजार कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत.

'ही' आहेत सुपर क्रिटीकल प्रकल्पाची वैशिष्ट्ये

६६० मेगावॅटचा सुपर क्रिटीकल प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पात अल्प किंवा प्रदूषणच न होणाऱ्या सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळे चिमणीतून राखच नव्हे तर अन्य फ्लू गॅसदेखील वातावरणात सोडले जाणार नाहीत. १०० टक्के अ‌ॅश युटिलायझेशन, शून्य टक्के प्रदूषण अशी या प्रकल्पाची खास वैशिष्ट्य आहेत. या प्रकल्पानंतर दीपनगरची स्थापित क्षमता १ हजार ८७० मेगावॅटवर पोहचणार आहे. २०१२मध्ये मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पाचे काम गेल्या २ वर्षांपासून युद्धपातळीवर सुरू असून, वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात ९०० परप्रांतीय कामगार घरी परतल्याने एप्रिल ते जून या काळात प्रकल्पाचे काम ठप्प झाले होते. मात्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, बिहार आदी राज्यांतून मजुरांना पुन्हा दीपनगरात आणून थांबलेले काम सुरू झाले आहे. सध्या १७०० मजुरांकडून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, दीपनगरात जागा उपलब्ध झाल्यास सौर ऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करुन दीपनगरातील पॉवर जनरेशन वाढवण्यासाठी प्रयत्न होणार आहेत, अशी माहिती वीजनिर्मिती केंद्राचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र निकम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

प्रकल्पात फ्लू गॅस डिस्फ्लुरायझेशनचाही समावेश

नवीन ६६० मेगावॅट प्रकल्पाच्या परवानगीत यापूर्वी समावेश नसलेल्या फ्लू गॅस डिस्फ्लुरायझेशन (एफजीडी) हे सयंत्र बसविले जाणार आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील ५० एसपीएमच्या धुलिकण मानकापेक्षाही निम्मे अर्थात केवळ २५ एसपीएम धुलीकण यामुळे हवेत मिसळले जातील. या सयंत्रामुळे थर्मल पॉवर व्होईस्टॅल्प बायहेलर वेल्डिंग थर्मल पॉवर जनरेशनमध्ये हे फ्लू गॅस डिस्फ्लुरायझेशन (एफजीडी) हा एक कंडल डिव्हाइस आहे, जो सल्फर डायऑक्साइड हवेत मिसळण्यापासून रोखणार आहे. अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग ६६० मेगावॅट प्रकल्पात राबविला जाणार आहे.

प्रदुषणाचा स्तर घटणार

दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे हवेतील प्रदुषणाचे प्रमाण गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी खूप होते. या भागात असलेल्या शेत शिवारातील केळीच्या पिकालाही मोठ्या प्रमाणावर फटका बसत होता. राखेच्या प्रदुषणामुळे केळीचा दर्जा खालावत असल्याने व्यापारी केळीला अल्पदरात मागणी करत असत. यात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत असे. मात्र, मागील वर्षात संच क्रमांक १ व २ बंद झाल्याने प्रदुषण काहीसे कमी झाले आहे. ६६० मेगावॅटचा प्रकल्प सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारित असल्याने वीजनिर्मिती प्रक्रियेत प्रदुषणाचे प्रमाण अत्यल्प होईल, त्यामुळे शेतीचे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे.

Last Updated : Jan 13, 2021, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.