ETV Bharat / state

डॉक्टरांमुळेच माझा पुनर्जन्म झाला, माझ्यासाठी ते देवदूत..! - jalgaon news

जळगावातील एका 60 वर्षीय वृद्ध महिलेने कोरोनाविराधात विजय मिळविला आहे. 'डॉक्टरांमुळेच माझा पुनर्जन्म झालाय, माझ्यासाठी ते देवदूत आहेत', अशा भावना वृद्धेने व्यक्त केल्या. भावना व्यक्त करताना तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू तराळत होते.

डिस्चार्ज देताना वैद्यकीय पथक
डिस्चार्ज देताना वैद्यकीय पथक
author img

By

Published : May 6, 2020, 7:42 PM IST

Updated : May 6, 2020, 10:24 PM IST

जळगाव - जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्टा आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील एका 60 वर्षीय वृद्धेने कोरोनाला हरवले आहे. कोरोनातून ठणठणीत बरे होऊन ही वृद्धा बुधवारी (दि. 6 मे) दुपारी तिच्या घरी परतली. तिच्या चेहऱ्यावर कोरोनाला हरवल्याचा आनंद दिसून येत होता. 'डॉक्टरांमुळेच माझा पुनर्जन्म झालाय, माझ्यासाठी ते देवदूत आहेत', अशा भावना वृद्धेने व्यक्त केल्या. भावना व्यक्त करताना तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू तराळत होते.

डॉक्टरांमुळेच माझा पुनर्जन्म झाला, माझ्यासाठी ते देवदूत..!

कोरोनावर मात करणारी ती जळगावातील दुसरी रुग्ण ठरली आहे. यापूर्वी जळगावातील एक 49 वर्षीय प्रौढ कोरोनातून पूर्णपणे बरा झाला होता. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील एका वृद्धेला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्यानंतर तिला 17 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. 18 एप्रिल रोजी रात्री तिच्या स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

तेव्हापासून कोरोना संसर्ग विशेष कक्षात तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान 14 दिवसांनंतर तिचा पहिल्या फेर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या फेर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने रुग्णालय प्रशासनाकडून तिला बुधवारी दुपारी साडेचार वाजता डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील, वृद्धेवर उपचार करणारे डॉ. विजय गायकवाड यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी तसेच नर्सने टाळ्या वाजवून वृद्धेला आनंदात निरोप दिला. एका सुसज्ज रुग्णवाहिकेतून त्या वृद्धेला तिच्या मुंगसे गावी रवाना करण्यात आले.

तुम्ही काळजी घ्या मुलांनो, पत्रकारांना केले भावनिक आवाहन

कोरोनाची लागण झाल्यानंतर खूप त्रास होतो. जगणे असह्य होऊन जाते. मात्र, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स यांच्यामुळे मी मरणाच्या दारातून परतले आहे. डॉक्टरांमुळेच माझा पुनर्जन्म झालाय, माझ्यासाठी ते देवदूत आहेत. त्यांनी 15 दिवसात माझ्यावर खूप चांगले उपचार केले. वेळोवेळी मानसिक आधार दिला. म्हणूनच मी कोरोनावर मात करू शकली. कोरोना होऊ नये म्हणून काळजी घ्या मुलांनो, असेही भावनिक आवाहन यावेळी कोरोनावर मात करणाऱ्या वृद्धेने प्रतिक्रिया देताना पत्रकारांना केले.

मी खूपच एकटी पडली होती

कोरोनाची लागण झाल्यानंतर मला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर सुरुवातीला खूप त्रास व्हायचा. मी खूप एकटी पडली होती. माझी दोन्ही मुले कामानिमित्त मुंबईत असतात. त्यांनाही काळजी वाटायची. पती देखील सुरुवातीला वेगळ्या वॉर्डात दाखल होते. एकमेकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता. त्यांच्या चिंतेने मन व्याकुळ व्हायचे. पण, रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्स मला मानसिक आधार द्यायचे. मावशी तुम्ही निश्चिंत ठणठणीत बऱ्या व्हालं, घरी परत जाल, असे सांगायचे. तेव्हा थोडा आत्मविश्वास वाढायचा. आज मी घरी परत जात आहे, याचा आनंद शब्दांत सांगू शकत नाही. कोरोनावर अजून आपण सर्वांनी मात केलेली नाही, त्यामुळे मी लॉक डाऊनचे पालन करणार आहे, तुम्हीही करा, असेही वृद्धेने सांगितले.

वृद्धेच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे हे फळ- डॉ. भास्कर खैरे

कोरोना संशयित म्हणून ही वृद्धा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली तेव्हा तिला सर्दी, खोकला आणि श्वसनाचा खूप त्रास जाणवत होता. मात्र, तातडीने तिच्यावर चांगले उपचार झाल्याने ती बरी झाली. याशिवाय वृद्धेच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे हे फळ आहे. आज दुसरा कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी परत जात आहे, ही आमच्यासाठी समाधानाची आणि आत्मविश्वास वाढवणारी बाब आहे. याशिवाय यातून एक चांगला संदेश समाजासमोर जात आहे. तो म्हणजे, जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर चांगले उपचार होत आहेत. 60 वर्षीय वृद्ध महिला कोरोनातून बरी होऊ शकते. त्यामुळे कोरोनाला घाबरून जाण्याची गरज नाही, असेही डॉ. खैरे यावेळी म्हणाले.

हेही वाचा - जळगावातील माध्यमिक शिक्षक पतपेढीतर्फे कोरोना लढ्यासाठी 11 लाखांची मदत

Last Updated : May 6, 2020, 10:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.