ETV Bharat / state

4 Year Old Girl Raped : 4 वर्षीय चिमुरडीवर नातलगानेच केला बलात्कार - Maharashtra Minor Girl Rape News

नातलगानेच चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार ( 4 Year Old Girl Raped ) केल्याची धक्कादायक घटना जळगावातील चाळीसगाव शहरात घडली आहे. वाईट कृत्य करणाऱ्या नराधमास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला.

4 year old girl raped in chalisgaon, jalgaon
4 वर्षीय चिमुरडीवर नातलगानेच केला बलात्कार
author img

By

Published : Nov 28, 2021, 12:20 PM IST

Updated : Nov 28, 2021, 12:39 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील चाळीसगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका नराधमाने चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार ( 4 Year Old Girl Raped ) केलाची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर पंचकृषीतील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

बलात्कार करणारा आरोपी नातलगच -

चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने जळगावच्या चाळीसगाव शहरात खळबळ उडाली आहे. वाईट कृत्य करणाऱ्या नराधमास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी हा नातलग असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यातच एका 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना घडल्याने पंचक्रोशीतून संतापाची लाट उमटू लागली आहे. नराधम पीडित मुलीच्या नात्यातला आहे. सावळाराम भानुदास शिंदे असे आरोपीचे नाव आहे. तो केवळ 26 वर्षांचा आहे. आरोपीने खाऊ घेऊन देण्याचे आमिष दाखवून चिमुरडीवर बलात्कार केला. त्यानंतर मुलीला तिच्या आईजवळ आणून सोडून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे रक्ताने माखलेले कपडे पाहून मातेला शंका आली. त्यानंतर आईने आरडाओरड केली.

आरोपीला नागरिकांनी चोपले -

आरोपी सावळाराम शिंदे हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना लोकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर स्थानिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर यांनी पीडित चिमुरडीवर अत्याचार झाल्याचे सांगत तिला गुप्तांगाला इजा झाल्याचे सांगितले. त्यामुळे तिला पुढील उपचार करण्यासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा - Doctor Woman Murder : निवृत्त महिला डॉक्टरची हात-पाय बांधून गळा चिरून हत्या

Last Updated : Nov 28, 2021, 12:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.