ETV Bharat / state

ऑनलाईन गंडा घालणारी परप्रांतीय टोळी गजाआड; सायबर पोलिसांची कारवाई - jalgaon cyber police

लवदीप लखीचंद याने महागडी कार विकायची असल्याची 'ओएलएक्स' या वेबसाईटवर जाहिरात दिली होती. ही जाहिरात जळगाव शहरातील निमखेडी भागात राहणारे परन देशमुख यांनी पाहून त्याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी लवदीप याने खोटे नाव सांगून लष्करात सैनिक असल्याची बतावणी केली होती.

cyber crime
ऑनलाईन गंडा घालणारी परप्रांतीय टोळी गजाआड
author img

By

Published : Feb 9, 2020, 4:35 PM IST

जळगाव - नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने गंडा घालणाऱ्या परप्रांतीय टोळीच्या जळगाव सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या टोळीने जिल्ह्यात ३ गुन्हे केले असून २ लाख ७० हजारांनी फसवणूक केली आहे. यामध्ये तिघे दिल्लीचे तर एक जण राजस्थानचा असल्याचे समोर आले आहे.

ऑनलाईन गंडा घालणारी परप्रांतीय टोळी गजाआड; सायबर पोलिसांची कारवाई

लवदीप लखमीचंद (वय २९, रा. खुर्द भांडोर, जि. भरतपूर, राजस्थान), फैज आलम रमातुल्ला (वय २८, रा. मोहन गार्डन, उत्तमनगर, दिल्ली), शेषनाथ जयप्रकाश गुप्ता (वय ४०, रा. मोहन गार्डन, उत्तमनगर, दिल्ली), आदित्य ब्रिजभूषण गर्ग (वय २१, रा. प्रताप गार्डन, उत्तमनगर, दिल्ली) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. २०१८ पासून ही टोळी नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा - महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये पोहोचली 'सूर्यवंशी'ची टीम, अक्षय कुमारने शेअर केला फोटो

लवदीप लखीचंद याने महागडी कार विकायची असल्याची 'ओएलएक्स' या वेबसाईटवर जाहिरात दिली होती. ही जाहिरात जळगाव शहरातील निमखेडी भागात राहणारे परन देशमुख यांनी पाहून त्याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी लवदीप याने खोटे नाव सांगून लष्करात सैनिक असल्याची बतावणी केली. 'माझी बदली राजस्थानातील जैसलमेर येथे झाली आहे. त्यामुळे मला गाडी विकायची आहे', असे कारण त्याने देशमुख यांना सांगितले. देशमुख यांनी कारची कागदपत्रे मागितली असता त्याने गाडीची बनावट कागदपत्रे पाठवली होती. त्यानंतर देशमुख यांचा विश्वास संपादन करून त्याने ऑनलाईन पद्धतीने वेळोवेळी दीड लाख रुपये घेतले होते. परंतु, पैसे देऊनही कार न मिळाल्याने देशमुख यांनी सायबर पोलिसात तक्रार केली होती. अखेर पोलिसांनी लवदीप याला राजस्थानातील भांडोर येथून अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्याचा सखोल तपास केला असता अशाच पद्धतीने गुन्हे करणाऱ्या दिल्लीतील इतर तिघांची माहिती पोलिसांना मिळाली होती. हे त्याचे साथीदार होते.

हेही वाचा - लहानपणापासून कमळ बघायचे संस्कार नाहीत

जुलै २०१९ मध्येही जळगाव शहरातील २ नागरिकांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक झाली होती. या भामट्यांनी दोन्ही नागरिकांना एसबीआय आणि ऍक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती तसेच ओटीपी क्रमांक विचारून सुमारे १ लाख २० हजार रुपयांनी गंडवले होते. याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीतून फैज आलम, शेषनाथ गुप्ता आणि आदित्य गर्गला अटक केली. ही कारवाई सायबर पोलीस विभागाचे निरीक्षक बळीराम हिरे, उपनिरीक्षक अंगद नेमाने, दिलीप चिंचोले, श्रीकांत चव्हाण यांच्या पथकाने केली.

Intro:जळगाव
नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने गंडा घालणारी परप्रांतीय टोळी जळगाव सायबर पोलिसांनी पकडली आहे. या टोळीमध्ये 4 जणांचा समावेश असून, 1 राजस्थानचा तर तिघे दिल्लीचे आहेत. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात या टोळीने केलेले जळगाव जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 70 हजार रुपयांचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.Body:लवदीप लखमीचंद (वय 29, रा. खुर्द भांडोर, जि. भरतपूर, राजस्थान), फैज आलम रमातुल्ला (वय 28, रा. मोहन गार्डन, उत्तमनगर, दिल्ली), शेषनाथ जयप्रकाश गुप्ता (वय 40, रा. मोहन गार्डन, उत्तमनगर, दिल्ली), आदित्य ब्रिजभूषण गर्ग (वय 21, रा. प्रताप गार्डन, उत्तमनगर, दिल्ली) अशी अटक केलेल्या चारही भामट्यांची नावे आहेत. हे चौघे सन 2018 पासून भारतभरातील नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने फसवण्याचे काम करत असल्याचे सायबर पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

लवदीप लखीचंद याने महागडी कार विकायची असल्याचे सांगत ऑनलाईन ओएलएक्स या वेबसाईटवर जाहिरात दिली होती. ही जाहिरात जळगाव शहरातील निमखेडी भागात राहणारे परन देशमुख यांनी पाहून त्याच्याशी संपर्क केला होता. त्यावेळी लवदीप याने खोटे नाव सांगून मी लष्करात सैनिक आहे. माझी बदली राजस्थानातील जैसलमेर येथे झाली आहे. त्यामुळे मला गाडी विकायची असल्याचे कारण सांगितले होते. देशमुख यांनी कारची कागदपत्रे मागितली असता त्याने गाडीची बनावट कागदपत्रे पाठवली होती. त्यानंतर देशमुख यांचा विश्वास संपादन करून त्याने ऑनलाईन पद्धतीने वेळोवेळी दीड लाख रुपये घेतले होते. परंतु, पैसे देऊनही कार न मिळाल्याने देशमुख यांनी सायबर पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांनी लवदीप याच्या राजस्थानातील भांडोर येथून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गुन्ह्याचा सखोल तपास केला असता अशाच पद्धतीने गुन्हे करणाऱ्या दिल्लीतील इतर तिघांची माहिती पोलिसांना मिळाली होती. हे त्याचे साथीदार होते.Conclusion:दिल्लीतील तिघेही अटकेत-

जुलै 2019 मध्ये जळगाव शहरातील 2 नागरिकांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक झाली होती. अज्ञात भामट्यांनी दोन्ही नागरिकांना एसबीआय आणि ऍक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती तसेच ओटीपी क्रमांक विचारून सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली होती. यासंदर्भात दाखल गुन्ह्याचा सखोल तपास केल्यानंतर सायबर पोलिसांनी दिल्लीतून फैज आलम, शेषनाथ गुप्ता आणि आदित्य गर्ग यांना अटक केली. ही कारवाई सायबर पोलीस विभागाचे निरीक्षक बळीराम हिरे, उपनिरीक्षक अंगद नेमाने, दिलीप चिंचोले, श्रीकांत चव्हाण यांच्या पथकाने केली.

बाईट: बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम विभाग जळगाव
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.