जळगाव - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढू लागली आहे. सोमवारी दिवसभरात नव्याने ३९६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यात जळगाव शहरातील सर्वाधिक १४५ रुग्णांचा समावेश आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये जळगाव व चाळीगाव शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ६१२७४ वर पोहचला असून, आतापर्यंत ५७१०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
गेल्या चोवीस तासांमधील आकडेवारी
जळगाव शहर-१४५, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-३६, अमळनेर-१२, चोपडा-64, पाचोरा-१, भडगाव-५, धरणगाव-२, यावल-१, एरंडोल-१, जामनेर-२, रावेर-५, पारोळा-१५, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-१७, बोदवड-१२ आणि इतर जिल्ह्यातील ६ असे एकूण ३९६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.