ETV Bharat / state

जळगावात भाजपला पुन्हा धक्का; 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल, आणखी 5 वाटेवर - जळगावचे 3 भाजप नगरसेवक शिवसेनेत दाखल

शिवसेनेने भाजपला पुन्हा दणका दिला आहे. काही दिवसांपूर्वीच मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या 4 भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता आणखी 3 भाजप नगरसेवकांनी शिवबंधन हाती बांधले आहे. तर आणखी 5 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.

jalgaon
जळगाव
author img

By

Published : May 30, 2021, 3:22 AM IST

जळगाव - मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या 4 भाजप नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर काही तास उलटत नाही, तोच जळगावातही शिवसेनेने भाजपला दुसऱ्यांदा मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या आणखी 3 नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे जळगाव महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ वाढून 45 इतके झाले आहे. दरम्यान, भाजपचे अजून काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ते येत्या 2 दिवसात हाती शिवबंधन बांधण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जळगावात भाजपला पुन्हा धक्का; 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल

'या' नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपच्या पिंप्राळा भागातील नगरसेवक सुरेश सोनवणे, शोभा बारी आणि शबिना बी शेख शरीफ या नगरसेवकांनी शनिवारी (29 मे) शिवसेनेत प्रवेश केला. या नगरसेवकांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपल्या हाती शिवबंधन बांधले.

भाजपला 2 महिन्यातच दुसरा धक्का

मार्च महिन्यात शिवसेनेने भाजपचे 27 नगरसेवक फोडून महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला होता. महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन, तर उपमहापौरपदी भाजपतून शिवसेनेत दाखल झालेले कुलभूषण पाटील यांना संधी मिळाली होती. या घडामोडी घडल्यानंतर 2 महिन्यातच शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला. भाजपचे आता पुन्हा 3 नगरसेवक फोडल्यामुळे महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ 45 पर्यंत पोहोचले आहे.

भाजपमध्ये खदखद

महापालिकेतील सत्ता गमावल्यानंतर भाजपच्या उर्वरित 30 नगरसेवकांमध्ये खदखद निर्माण झाली होती. प्रभागातील कामेदेखील थांबल्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी वाढत होती. हिच आयती संधी साधत शिवसेनेने भाजपचे पुन्हा 3 नगरसेवक गळाला लावले आहेत.

'आणखी 5 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर'

'भाजपचे आणखी 5 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत. ते लवकरच शिवसेनेत दाखल होतील. आम्ही कुणाला बळजबरी करत नाही. पालकमंत्री पदाचा बडेजावपणाही दाखवत नाही', अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नगरसेवकांच्या पक्षांतराबाबत दिली.

भाजपला मोठा 'सेटबॅक'

जळगाव महापालिकेत भाजपने 57 नगरसेवकांसह स्पष्ट बहुमत मिळवले होते. परंतु, गेल्या 2 महिन्याच्या काळात भाजपातून 30 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. हा भाजपला मोठा सेटबॅक मानला जात आहे.

दरम्यान, महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीवेळी ज्या 27 नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा मार्ग निवडला होता. त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची टांगती तलवार होती. मात्र, आता 3 नगरसेवक पुन्हा शिवसेनेत दाखल झाले आहेत. अजून काही नगरसेवक दाखल होणार आहेत. त्यामुळे हे सर्व नगरसेवक आपला स्वतंत्र गट स्थापन करतील. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार असलेली कारवाईची टांगती तलवारही दूर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - 'तारीख ठरवा, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ'; आयएमएकडून रामदेव बाबांना खुल्या चर्चेचे आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.